Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधानी नाही - मंत्री जयंत पाटील

 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधानी नाही - मंत्री जयंत पाटील


मुंबई : राज्यसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपून जवळपास नऊ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आमदार सुभाष खांदे यांचे मत बाद ठरवले. या निर्णयाबाबत महाविकास आघाडी समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना मंत्री जयंत पाटील

राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया दुपारी चार वाजता संपली. संध्याकाळी पाच नंतर मतमोजणीला सुरुवात होणे अपेक्षित होते. भाजप आणि महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एकमेकांविरोधात तक्रार केल्याने मतमोजणीची प्रक्रिया रखडली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची तब्बल तीन तास बैठक झाली. या बैठकीनंतर मतदान केंद्रावरील व्हिडिओ आणि मतदान प्रक्रिया तपासण्यात आली. सुमारे नऊ तासांहून अधिक कालावधीनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यावर हरकत घेतली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, सुभाष कांदे यांचे मत वैध आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एका आधारे निकाल दिला आहे. या निकालावर आम्ही समाधानी नाही. सर्व प्रक्रिया पाहून आघाडी सरकार पुढील निर्णय घेईल, असे पाटील यांनी सांगितले. तसेच, केवळ एक ते दीड तासाच्या मतमोजणीचा कालावधी ज्याप्रकारे वाढवला गेला, हे सूडाच्या राजकारणाचा प्रकार असल्याचेही त्यांनी म्हटले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.