Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब....

 सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब....


पक्षांतर बंदी कायदा सभागृहाच्या बाहेर केलेल्या पक्षविरोधी कारवायाना सुद्धा लागू सभागृहातच नव्हे तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमदार/ खासदारांनी केलेल्या पक्षविरोधी कारवाया, त्यांच्या अपात्रते साठी कारणीभूत ठरू शकतात, हा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बिहार जनता दलाच्या दोन खासदारांचे राज्यसभा सदस्य पद रद्द करताना दिलेला निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला ! त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायदा हा सभागृहाच्या बाहेर केलेल्या पक्षविरोधी कारवायाना सुद्धा लागू ठेवू शकतो, हे स्पष्ट झाले आहे .

त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आलेला निर्णय महाराष्ट्राच्या सद्य परिस्थितीतील शिंदे सेनेच्या शिवसेना पक्ष विरोधी कारवायांच्या संबंधात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि या बंडखोर आमदारांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात हंगामी सभापती नरहरी झिरवाळ यांना खूप मोठे पाठबळ मिळाले आहे !


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.