Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ‍विनामुल्य प्रवेश घेण्याचे आवाहन

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ‍विनामुल्य प्रवेश घेण्याचे आवाहन


सांगली, दि. 7, : भटक्या जमाती व प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात रामरतन एज्युकेशन फाऊंडेशन संचलित एस. के. इंटरनॅशनल स्कुल पेठ शिराळा रोड रेठरे धरण या शाळेची शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. या शाळेमध्ये धनगर समाजातील इच्छुक विद्यार्थ्यांनी विनामुल्य प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतच्या शासन निर्णयान्वये उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होत असल्याने धनगर समाज्याचे विद्यार्थी मागे पडू नयेत तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेता यावे व स्पर्धेत टिकून राहता यावे या दृष्टीने या समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये विनामुल्य प्रवेश देणे ही योजना सुरू करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असलेल्या पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेंतर्गत एकूण 100 विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश घेता येईल. या पेक्षा जास्त अर्ज प्रवेशाकरीता प्राप्त झाल्यास लकीड्रॉ पध्दतीने प्रवेशाकरीता निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड कलानगर सांगली दुरध्वनी क्रमांक 0233-2374739 व मुख्याध्यापक एस. के. इंटरनॅशनल स्कुल पेठ शिराळा रोड रेठरे धरण ता. वाळवा, जि. सांगली यांच्या कार्यालयाशी 9404537940/9359038866/8007975005 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.