गणधराचार्य जगद्गुरु १०८ श्री कुंथुसागरजी महाराजांच्या अमृत संयम वर्धन महोत्सवाचे आयोजन
श्री क्षेत्र कुंथुगिरी लोकांच्या श्रद्धेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असलेले परम पूज्य जगद्गुरु भारत गौरव मंत्रविद्या चक्रवर्ती गणाधिपती गणधराचार्य १०८ श्री कुथुसागरजी गुरुदेव महाराजांचा अमृत संयम वर्धन महोत्सव शुक्रवार दि. १० जून ते १२ जून २०२२ रोजी श्री. क्षेत्र कुंथुगिरी, आळते येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक गणधराचार्य श्री कुंथुसागरजी महाराजांच्या अमृत संयम वर्धन महोत्सव समितीचे गौरवाध्यक्ष नाम, राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वागताध्यक्ष तथा माजी महापौर सुरेश पाटील (सांगली), यांनी दिली. याप्रसंगी गणाधिपती गणधराचार्य प्रधानाचार्य कुंथुसागर विद्याशोध संस्थानचे अध्यक्ष आर. के. जैन, कार्याध्यक्ष कुंतीलाल पाटणी, व्यवस्थापक सुधीर पाटील, जयश्री दीदी, पूनम पांडे, सुरेश मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.
परमपूज्य श्री. कुंथुसागरजी महाराज यांचे जीवन जैन समाज आणि जैन धर्मासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे. ५८ वर्षाच्या संयम जीवनामध्ये त्यांनी श्रावकांना शिक्षण आणि दीक्षा देऊन मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे. सध्या त्यांच्या बहुतेक शिष्यांना आचार्यपद दिलेले एकमात्र गुरू आहेत. त्यांच्या प्रेरणेतून राजस्थान येथील आनिंदा पार्श्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हयातील श्री. क्षेत्र कुंथुगिरी सम्मेदाचल पर्वताचे नवनिर्वाण हे विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांनी आयुष्यात जवळपास ६० हजार कि.मी. अंतर पदभ्रमण केलेले आहे. या पदयात्रा करून देशभरातील सिद्धक्षेत्रे आणि अतीशयक्षेत्रांची पूजा करण्याबरोबरच अनेक शहरे आणि खेड्यांमध्ये चातुर्मास कैलेले आहेत. शेकडो गावांमध्ये पंचकल्याणक पूजा अनेक विस्तृत विधानपूजा करून धर्माचा अलौकिक प्रभाव पाडला आहे. जैन साहित्य, तत्त्वज्ञान, अध्यात्म, जैनविद्या, मंत्रयंत्र विद्या, आयुर्वेद असे शेकडो मौल्यवान ग्रंथ त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेले आहेत.
अमृत संयम वर्धन महोत्सवाच्या तीन दिवसीय कार्यक्रमात राष्ट्रीय युवा व महिला संमेलन, देशभरातील जैनसमाजाच्या सर्वोच्च संस्थांचे राष्ट्रीय जैन चिंतन शिबीर अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दि. १० जून रोजी स. ०७:०० वाजता ध्वजारोहन एवंम महामृत्युंजय विधानाने महोत्सवाचा शुभारंभ होईल. स. ०८:३० वा. ते सायं ०७:०० पर्यंत पंचामृताभिषेक, आहारचर्या, पद्मावती देवीची महापूजा, आरती एवंम गुरुभक्ती कार्यक्रम संपन्न होतील. • शनिवार दि. १९ जून रोजी स. ०९:०० वा. ७६ घोडे, ३ हत्ती, ३ बँडच्या सहभागाने भव्य
मिरवणुकीस शुभारंभ होणार आहे. स. ०९:३० वा. आहारचर्या, १० वा. पंचामृत अभिषेक व स.११:०० वा सौ. प्रीती विजय शहा, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय युवा व महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभरातील प्रसीद्ध वक्ते निमंत्रित करण्यात आले आहेत. त्यामध्ये इंदोरचे अशोक बडजात्या 'देश निर्माणमे युवा और महिलाओंका योगदान', बैंगलोरच्या श्रीमती लावण्या बल्लाळ 'महिला सक्षमीकरण', अहमदाबादचे जगत शहा 'आओ भारत को फिर से बनाये सोने की चिडिया' नवी मुंबईच्या श्रीमती. दिव्या मोमंया उद्योग व्यापारमे महिलाए आत्मनिर्भर कैसे बन सकती है या विषयावर व्याख्यान देणार असून जैन महिला परिषदेच्या अध्यक्षा सौ. स्वरूपाताई राजेंद्र पाटील-यड्रावकर, विरसेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत है संमेलन संपन्न होईल यावेळी महावीर कासलीवाल, इचलकरंजी यांना श्रावक शिरोमणी पुरस्कार, दृष्टी जितेन्द्र जैन, पुणे यांना युवती पुरस्कार तर आदित्य रवींद्र फतेपुरीया, जयपूर यांना युवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संयोजक विनोद दोडन्नावर बेळगावी हे आहेत. दु. ०३:०० वाजता पूज्य गुरुदेवांचा ७६ भक्तांच्या द्वारे पादप्रशालन, सायं. ०७:०० वाजता आरती एवंम गुरुभक्ती भव्य नाटक नाटिका सादर होईल.
संध्या ०६:०० वाजता 'जैन समाज की वर्तमान परिस्थिती और प्रगतीकी दिशा' यावरती 'राष्ट्रीय जैन चिंतन शिबिर २०२२ चे आयोजन करण्यात आले असून भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे अध्यक्ष शिखरचंदजी पहाडिया ( मुंबई ), दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (बोरगाव), भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा (पुणे), भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजराजजी गंगवाल (दिल्ली), दिगंबर जैन ग्लोबल महासभेचे अध्यक्ष जमनालालजी हपावत (मुंबई) श्री दिगंबर जैन महासमितीचे अध्यक्ष अशोक बडजात्या (इंदोर), जितो अपेक्सचे व्हा. चेअरमन विजय भंडारी (पुणे) हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या चिंतन शिबिराचे संयोजन भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महामंत्री संतोषजी जैन- पेंढारी (नागपूर), सकल जैन समाज राष्ट्रीय जैन चिंतन शिबिर २०२२ यांनी केले आहे.
महोत्सवाची सांगता रविवार दि. १२ जून रोजी होणार असून स. ०५:०० ते सायं. ०७:०० पर्यंत मंगल वाद्य, गुरुपूजन, आहारचर्या विशेष महामस्तकाभिषेक, विनयांजली, अमृत संयम वर्धन महोत्सव मुख्य कार्यक्रम, किताब विमोचन, आरती व गुरुभक्ती अशी कार्यक्रमाची रूपरेषा राहिल. तसेच या निमित्ताने विकलांग व्यक्तींना सहाय्य वाटप व कुंथुगिरीच्या डोंगरावर ७५ एकर मध्ये बीजारोपण करण्यात येणार आहे. तरी समाजातील सर्व श्रावक, श्राविकांनी या महोत्सवास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.