Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदी, फडणवीसांनी कारवाई केली तरी बेहत्तर, शिवसेनेसोबतच राहणार; भाजप खासदाराचं विधान

 मोदी, फडणवीसांनी कारवाई केली तरी बेहत्तर, शिवसेनेसोबतच राहणार; भाजप खासदाराचं विधान


राज्यात भाजप आणि शिवसेना पक्ष राजकीय वैरामुळे एकमेकांवर टीका करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. दोन्ही पक्षांत टोकाचे राजकीय वाद असताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबत राहणार असल्याचा इरादा बोलून दाखविला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांनी आपल्यावर कारवाई केली तरी चालेल, असे अस वक्तव्य करून पक्षाला आव्हान दिले आहे.

पारनेर तालुक्यातील एका पदाधिकार्‍याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी, सभापती गणेश शेळके, युवा नेते सचिन वराळ, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, अ‍ॅड. बाबासाहेब खिलारी, बाळासाहेब माळी, शंकर नगरे, प्रियंका शिंदे, अश्विनी थोरात, योगेश रोकडे, दीपक पवार, सागर मैड आदींसह भाजप, सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, मी खासदार म्हणून निवडून येण्यात 50 टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे.

माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले, याची मला खंत वाटली नाही. शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. ही हिंमत माझ्यामध्ये आहे, कारण मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी, असे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण दिले. गेल्या काळात पारनेर तालुक्यात शिवसेनेचा आमदार असताना मोठी कामे झाली. येणार्‍या काळात कोणाची कशी आघाडी होणार हे माहिती नाही. मात्र, मी मात्र शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.