Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मधुकर भावे - एका मोठ्या मनाची जन्मशताब्दी....!

मधुकर भावे -  एका मोठ्या मनाची जन्मशताब्दी....!


२ जुलै २०२२ हा दिवस बाबूजींच्या (जवाहरलाल दर्डा)  जन्मशताब्दी वर्षांच्ाी सुरुवात. बाबूजींचा जन्म २ जुलै १९२३... पुढच्या वर्षी शताब्दी वर्षाची समाप्त्ाी होईल. वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलैचा. बाबूजींचा २ जुलै... दोघांमध्ये जवळपास १० वर्षांचे अंतर... पण घट्ट मैत्रीमध्ये हे अंतर कधीच जाणवले नाही. यासाठी दोन्ही व्यक्तीमत्त्वांच्या मनात एक मोठेपण असावे लागते. ते दोघांमध्ये होते. म्हणून ही मैत्री िटकली. बाबूजी हा मोठ्या मनाचा माणूस होता. एवढंच नव्हे तर आयुष्यामध्ये चारही बाजूंनी हल्ले होत असताना कोणत्याही व्यक्तीमत्त्वाने किती समचित्त रहावे, याचा बाबूजी आदर्श होते. त्यांच्यासोबत मी १९७४ ते १९९७ पर्यंत... त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत होतो. आयुष्यात त्यांच्या विरोधातील व्यक्तीबद्दल एकही चुकीचा शब्द, अनादराचा शब्द त्यांनी कधीही उच्चारला  नाही. ते स्वातंत्र्यसेनानी होते. १८ महिने जबलपूर येथील तुरुंगात त्यांना सक्त मजुरीची  शिक्षा झाली होती. त्यांच्यासोबत वीर वामनराव जोशी होते. खामगावच्या राष्ट्रीय शाळेचे प्राचार्य पंधे गुरुजी होेते. त्यांनी आपल्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीची कधी शेखी मिरवली नाही. 

पण राजकारणातील विरोधकांनी, १८ महिने तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तीलाही राजकारणाकरिता विधानमंडळात ‘लक्ष्य’ बनवले. विधानमंडळाचे कामकाज बंद पाडले. ‘तुम्ही स्वातंत्र्यसैनिक नाहीत....’ असे आरोप झाले. नागपूरातील एका वृत्तपत्राने वर्षभर बाबूजींच्या विरुद्ध मुख्य िशर्षक करून मोहीम चालवली. या सर्व वेळी बाबूजींनी आपला तोल कधीही ढळू िदला नाही. त्यांच्यासोबत आयुष्याची २४ वर्षे गेली. या व्यक्तीमत्त्वाच्या मनाच्या उंचीची कल्पनाच करता येणार नाही. विधानमंडळात एवढा हल्ला झाल्यावर त्यांना सांगण्यात अाले की, ‘तुम्ही खुलासा करा....’ एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाने पत्रकार परिषद घेतली असती... बाबूजींच्या हातात तर स्वत:चे एवढे मोठे वृत्तपत्र होते. पण त्यांनी स्वत:साठी ते वृत्तपत्र कधीही वापरले नाही. सामान्य माणसाला न्याय देण्याकरिता ते वापरले. त्याच करिता एवढा आटापिटा केला. विधातमंडळात जेव्हा ते खुलासा करायला उभे राहिले तेव्हा म्हणाले की, ‘जे माझे विरोधक स्वातंत्र्य संग्रामात कधीही नव्हते... त्या  आमदारांना ‘मी स्वातंत्र्य संग्रामात होतो’, हे सांगण्याची मला गरज वाटत नाही...’ बाबूजींच्या असामान्य वैचारिक भूमिकेने उत्तर ऐकून मी थक्क झालो... हा वेगळा माणूस होता. 

माझ्या आयुष्याची सुरुवात दैनिक ‘मराठा’ पासून झाली. आचार्य अत्रे यांनी मला संधी दिली नसती तर माझ्ो आयुष्य कुठल्या कुठे वाहत गेले असते. १४ वर्षे ‘मराठा’. म्हणजे १९७४ पर्यंत.... ‘मराठा’ बंद  झाला. त्याची कारणे वेगळी होती. आता काय करावे, हा प्रश्न होता.... महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत १९७४ च्या सप्टेंबर महिन्यात दर्डांजींची भेट झाली. त्यांनी सहज विचारले.... ‘काय करता सध्या...’ मी म्हणालो... ‘काहीच नाही’.  ते म्हणाले, ‘माझ्यासोबत आमच्या लोकमतला येता का?’, प्रश्न अवघड होता. माझी मराठातील प्ात्रकारिता तिखट होती. ‘त्यांचं आिण माझं कसं जमेल?’ असा प्रश्न मनात आला. मी तो बोलून दाखवला... त्यावेळी दर्डाजी म्हणाले.... ‘मी तुम्हाला सूट होतो का ते पहा.... तुम्ही मला सूट होता का ते मी पाहताे...’ मी ऐकत राहिलो... कोणत्याही वृत्तपत्राचा मालक, संपादक.... ‘मी तुम्हाला सूट होतो का पहा.... ’ असं म्हणणार नाही. मी त्या वाक्यानेच बाबूजींच्या मनाची ठेवण समजून चुकलो. दुसऱ्या िदवशी भेट ठरली... मी पोहोचलो तेव्हा दुपारचा १ वाजला होता... ते जेवायला बसले होते... मी बाहेर थांबलो तर हिराजी नावचा शिपाई बोलवायला आला.... ‘बाबूजींनी तुम्हाला आत बोलावले आहे...’ मी त्याला म्हटलं.... ‘मला बाबूजींना भेटायचे नाही... दर्डांजीना भेटायचे आहे....’ तो म्हणाला.... ‘तेच बाबूजी...’ त्या िदवसापासून दर्डाजी या नावाऐवजी ते माझे बाबूजी झाले. 

मी आत गेलो तेव्हा ते जेवायला बसले होते. त्यांनी बाजूला बसवले... लिलाधर महाराज नावाचे स्वयंपाकी होते... त्यांना थाळी लावायला सांिगतली... बाबूजींच्या पानातली भाकरी उचलून अर्धी भाकरी त्यांनी माझ्या पानात ठेवली. हे सगळं मी हळूवारपणे पाहात होतो. हे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे, हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला जाणवू लागले. ते सहजपणे म्हणाले, ‘मस्त जेवून घ्या.... मग गप्पा करू....’ नंतर मनाचे धागे असे काही जुळले की, लोकमतचा आिण बाबूजींचा कधी होवून गेलो, ते मलाही कळले नाही. लोकमत सोडून आज मला २२ वर्षे झाली. त्या आधी २४ वर्षे लोकमत सोबत होतो, बाबूजींसोबत होतो. पण आधीची २४ वर्षे आिण आताची २२ वर्षे आजही बाबूजी बरोबर आहे, असेच वाटते आिण मी लोकमत परिवारात आहे, असेच जाणवते.... 

बाबूजींचे आगळेवेगळेपण त्यांच्या मोठ्या मनात आणि माणुसकीमध्ये होते. एका छोट्या साप्ताहिकाचा महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकात वटवृक्ष करण्याची धमक त्यांनी दाखवली. भूिमका स्वच्छ मांडली. त्या भूिमकेवर ते ठाम राहिले. काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला, काँग्रेसचा विचार सोबत बाळगला... पण वृत्तपत्र चालवताना ‘पक्ष आिण वृत्तपत्र’ याची भेसळ त्यांनी कधी होवू दिली नाही. म्हणून सामान्य माणसांचे प्रश्न आग्रहाने मांडा, हा आग्रह त्यांनी धरला. आठ वेळा मंत्रीपदाची शपथ घेतलेले बाबूजी २४ वर्षे विधान परिषद आमदार होते. त्यात अनेकवेळा मंत्री... पण लोकमतमध्ये बातमी देताना त्यांनी आम्हाला कोणालाही आडवले नाही. त्यांच्या खात्याच्या विरोधातील बातमीही बेशक छापा, असे सांगताना ते म्हणाले होते, ‘मी सरकारात आहे... लोकमत सरकारात नाही...’ 

२ जुलै रोजी बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत असताना आज २४ वर्षांतील सहवासाचे बाबूजी असे समोर उभे अाहेत. ते मुंबईत आहेत आिण मी त्यांच्याबरोबर दिवसभर नाही, असे कधीच घडले नाही. त्यांच्या मनात ‘मोठ्या मनाचा माणूस’ कायमचा वस्तीला होता. माणूसपण त्यांनी जपले. कधी अहंकार बाळगला नाही. सत्तेची किंवा संपादकपदाची एक गुर्मी असते.... बाबूजींना अशा प्रवृत्तीचा कधी गंधसुद्धा नव्हता. अत्रेसाहेबांनी मला वयाच्या २४ व्या वर्षी ‘मराठा’चा मुख्य वार्ताहर केले... बाबूजींनी मला वयाच्या ३७ व्या वर्षी (१९७७) जळगाव लोकमतची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली. संपादक केले. नागपूर लोकमत, जळगाव लोकमत आिण बाबूजी गेल्यानंतर मुंबई लोकमतचे संपादक पद भूषविताना बाबूजींच्या आठवणीतील ती २४ वर्षे समोर येत राहतात. पत्रकारितेतील ५०-६० वर्षे खूपकाही शिकवून गेली. खूप मोठी माणसं पाहता आली. त्यांचा सहवास मिळाला... माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या आयुष्याचे सोने होईल, असे ते सगळे िदवस होते. छोट्या छोट्या गोष्टींतून आपण प्रत्येक दिवशी काही ना काही शिकत असतो. बाबूजी तर एक विद्यापीठच होते. त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनही किती गोष्टी शिकायला मिळत होत्या. 

१९८० साली बॅ. अंतुले यांच्या मंत्रीमंडळात ते उद्योगमंत्री झाले. उद्योग खाते हे मोठे खाते आहे. उद्योग क्षेत्रातील अनेक लोक सूटा-बूटासह बाबूजींना भेटायला आले... अिभनंदन केले... त्यातील अनेकांना बाबूजी ओळखत नव्हते. हार -पुष्पगुच्छ यांनी लिलीकोर्टमधील बाहेरचा हॉल भरून गेला... तीन-चार तास गर्दी होती. गर्दी ओसरली... बाबूजींनी त्यांचा सेवक हिराजीला हाक मारून सांिगतले की, ‘हिराजी, महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्याचे हे सगळे पुष्पहार आिण गुच्छ उचल. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना शुभेच्छा देवून गुच्छ देवून ये. यातील एकही गुच्छ जवाहरलाल दर्डाचा नाही... महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्याचा आहे....’ 

सत्तेचा नेमका अर्थ बाबूजींना कळलेला होता. त्यामुळे मंत्रीपद िमळाले म्हणून ते कधीही हुरळून गेले नाहीत आिण मंत्रीपद नव्हते तेव्हा ते कधीही निराश झाले नाहीत. सतत उत्साहाचा एक धबधबा त्यांच्या आयुष्यात वाहत होता. त्यामुळे ते कधी िरकामे बसले नाहीत. एक काम झाले की, दुसरे काम त्यांनी हातात घेतले. पहिल्यांदा लोकमत द्विसाप्ताहिक.... मग साप्ताहिक... मग दैनिक, मग नागपूरहून जळगाव, मग औरंगाबाद आिण मग सारा महाराष्ट्र... आज लोकमत दैनिक महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक बनू शकले. कारण बाबूजींचा विचार आिण वाचकांच्याप्रती निष्ठा. ते नेहमी सांगायचे, ‘सरकारवर अवलंबून वृत्तपत्र चालवू नका... वृत्तपत्राचा खरा मालक वाचक आहे, हे लक्षात ठेवा...’ ते कुठेही असोत.... त्यांचे लोकमतवर बारिक लक्ष होते. बघता -बघता लोकमत ने महाराष्ट्र व्यापला. बाबूजींच्या विरोधात ज्या राजकीय आघाड्या उघडल्या गेल्या त्याची कारणं तर हीच होती. एक तर लोकमतचा वाढता प्रभाव आिण दुसरं म्हणजे कोणीही मुख्यमंत्री असला तरी बाबूजींिशवाय त्यांचे मंत्रीमंडळ बनलेच नाही. याचे कारण गुंतागुंतीच्या कोणत्याही विषयात बाबूजी राजकीय निरगाठी पायाच्या अंगठ्यानेसुद्धा सोडवू शकत होते. त्यांच्याजवळ एवढी खूबी होती. 

त्यांचा आणखीन एक गुणविशेष आहे.... महाराष्ट्रातील भल्या-भल्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला.... प्रत्येकाची कारणं वेगळी... पण पक्ष सोडला हे सत्य. बाबूजी हे एकमेव व्यक्तिमत्त्व असे की, त्यांनी कधीही आपला राजकीय विचार सोडला नाही, पक्ष सोडला नाही.... आिण काँग्रेसची निष्ठा सोडली नाही. ही गोष्ट सोपी नव्हती. आजची राजकीय पळापळ पाहिल्यानंतर एका विचारावर ठाम उभे राहणे, ही सोपी गोष्ट नाही. पण बाबूजी विचारांवर उभे राहिले. लोकमत त्यामुळेच वाढू शकले. सामान्य माणसांची नाळ लोकमतने तोडली नाही. 

बाबूजींनी आयुष्यभर खादी कपडे वापरले. खादी हा कपड्याचा प्रकार नाही. खादी हे तत्त्वज्ञाान आहे. ज्यांनी खादी वापरली त्यांच्या जीवनाला वेगळा अर्थ आहे, असे समजले जायचे. बाबूजी जेव्हा मंत्री नव्हते तेव्हा त्यांना रोजच्या कामाकरिता एका सेवकाची गरज होती. मुंबईत त्यावेळी लोकमत दैनिक नव्हते. एका स्थानिक पेपरमध्ये जाहिरात दिली.... चार-पाच लाेक भेटायला आले. त्यात श्री. ठिपसे नावाचे एक जेष्ठ गृहस्थ होते... त्यांना बाबूजींनी बसवून ठेवले. बाकीच्या तिघा-चौघांशी थोडी चर्चा केली आिण त्यांना पाठवून दिले.  नंतर ठिपसे यांना ‘िठपसेसाहेब’ असं म्हणून ‘काम सुरू करा’, असे त्यांनी सांिगतले. ते म्हणाले की, ‘दर्डासाहेब, दोघा-तिघांशी तुम्ही चर्चा केलीत, मला काही न विचारता काम सुरू करायला सांिगतलेत.... ’ बाबूजी म्हणाले, ‘तुम्हाला काही विचारण्याची गरज नाही... तुमच्या अंगावर खादीचे कपडे आहेत...’

पुढे हेच ठिपसेसाहेब बाबूजींकडे सात वर्षे िनष्ठेने काम करत होते. नंतर बाबूजी दोनदा मंत्री झाले. पण त्यांनी ठिपसे साहेबांना बाजूला केले नाही. 

बाबूजींकडे एक महाराज होते. त्यांचं नाव लिलाधर महाराज.... पांढरा शर्ट, धोतर, पांढरी टोपी, असा त्यांचा छान वेष... गोरेपान... जेवण उत्तम  करायचे... ४० वर्षे बाबूजींकडे होते. ७५ वर्षे झाल्यावर थकले. गावी किशनगढला जातो म्हणाले... प्रसंग साधा आहे... पण बाबूजी आिण उषाताईंचे मोठेपण त्यात जाणवले... त्या दिवशी किशन महाराजांनी स्वयंपाक केला नाही... उषाताईंनी केला. त्यांना खूर्चीवर बसवून जेवायला वाढलेे... बाबूजींनी धोतर, शर्टाचे कापड... आिण दहा हजार रुपये रोख त्यांना भेट िदले.... िशवाय ते जिवंत असेपर्यंत त्यांना पेन्शन चालू ठेवली. विषय साधेसाधे आहेत. पण माणुसकीचे झरे मनामध्ये पाझरत असतात तेव्हाच या गोष्ट सहज घडत असतात. कृित्रमतेने हे घडत नाही. नागपूर असो, यवतमाळ असो, मुंबई असो.... बाबूजी जिथं जिथं होते तिथं तिथं त्यांनी किती लोकांना, किती सहकाऱ्यांना कशाप्रकारे आिण िकती मदत केली, याचा हिशोब नाही. आिण जे केले ते डाव्या हाताचे उजव्या हाताला समजू दिले नाही. कोणत्याही गोष्टीचा अिभमान िमरवला नाही. अहंकाराला थारा िदला नाही. एखादी गोष्ट चांगली घडली म्हणून हुरळून गेले नाहीत. मनासारखी गोष्ट झाली नाही म्हणून कधी निराश झाले नाहीत. आयुष्यात त्यांच्याकडून खूप शिकलो... माझी मोठी मुलगी मनीषा.... १९७८ साली कॅन्सरने वारली... मी खचून गेलो... आयुष्यात तो मोठा पराभव होता. मी तिला वाचवू शकलो नव्हतो. बाबूजी घरी आले... पािठवर थाप मारली... म्हणाले, ‘सिकंदराच्या घरी काही अडचणी आिण दु:खाचे प्रसंग आलेच असतील... पण तो जग िजंकायचा थांबला नाही... आयुष्यात अशा प्रसंगात हिमतीने उभे राहायचे.... आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत....’ बाबूजींच्या त्या शब्दांनी एक नवी हिम्मत मिळाली. आज या सगळ्या गोष्टी आठवतात... लोकमतचे ते िदवस अाठवतात... एक एक आठवण अशी ताज्या फुललेल्या गुच्छासारखी.... समोर सुगंध दरवळीत आहे, असाच भास होतोय.... मी ‘मराठा’तून  ‘लोकमत’मध्ये येताना, मी कुठून कुठे चाललो आहे, असा विचार मनात होता... पण बाबूजींनी माझ्या सगळ्या गुण-दोषांसकट मला नुसते सांभाळून घेतले नाही तर त्यांच्या परिवाराचा एक सदस्य मानले. आिण आजही विजयबाबू आिण राजनबाबू, पूर्ण दर्डा परिवार त्याच नात्याने आम्ही वावरत आहोत. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर हे असे संबंध हाच मोठा बँकबॅलन्स असतो. 

बाबूजींचे मोठेपण हे त्यांच्या सहज वागण्यात होते. दुसऱ्यांना मदत करण्यात होते. आिण त्याची जािहरात न करण्यात होते... बाबूजींवर गौरवग्रंथ केला तेव्हा अनेकजणांनी मुलाखतीत सांिगतले... ‘बाबूजींमुळे मी आमदार झालाे... बाबूजींमुळे मला तिकीट मिळाले... बाबूजींमुळे माझे हे काम झाले... बाबूजींमुळे माझ्या मुलीला मेडिकलला अॅडमिशन िमळाली.... बाबूजींमुळे मला आजारपणात योग्य उपचार मिळाले....’ एकही मुलाखत अशी नाही की, ज्यात बाबूजींचे मोठेपण सांिगतले गेले नाही. आिण आयुष्याच्या मोठेपणाची हिच तर गंमत आहे. व्यकि्तचे मोठेपण दुसऱ्यांनी सांगावे.... आिण आयुष्यात िशल्लक जे राहते ते एवढच िशल्लक राहतं... बाबूजी मागे ठेवून जे गेले तो हाच मोठेपणा मागे ठेवून गेले आहेत. २ जुलै रोजी बाबूजींची जन्मशताब्दी सुरू होत आहे.... गौरवग्रंथातील मुलाखतीत विजयबाबू म्हणाले, ‘मी जवाहरलाल दर्डा विद्यापीठात शिकलो....’ विजयबाबू, ते खरं आहे... पण, बाबूजी हे व्यक्तिमत्त्व एका विद्यापीठापुरते मर्यादित नव्हते. १० विद्यापीठांत जे शिकता येणार नाही, ते त्यांच्यासोबत िशकता आले. 

शेवटचा मुद्दा सांगतो... बाबूजींच्या विरोधात टाईम्स अॅाफ इंिडया समूहातील ‘नवभारत टाईम्स’ने एक धडधडीत खोटी बातमी छापली. बाबूजींनी बदनामीचा दावा केला. मुंबईच्या हायकोर्टात केस चालली. हायकोर्टाचे न्यायाधीश एम. सी. छागला यांनी त्या वृत्तपत्राला पहिल्या पानावर माफी मागायला लावली. माफी प्रसिद्ध झाली... विषय संपायला हवा होता... बाबूजी म्ाला म्हणाले... ‘भावेसाब...., श्रेयंप्रसाद जैनसाहब को िमलने को जाना है.... उनकी माफी मांगना है.... ’ आम्ही टाईम्स चे चेअरमन जैन साहेबांच्या घरी गेलो... बाबूजी काय म्हणावेत... ‘नाईलाजाने मला तुमच्या वृत्तपत्राविरुद्ध आत्मसन्मानासाठी दावा करावा लागला... माझ्या बाजूने निकाल लागला असला तरी माझ्यामुळे तुम्हाला क्लेष झाला... यासाठी मी माफी मागायला आलो आहे.... तुम्हाला त्रास देण्याचा माझा उद्देश नव्हता...’  टाईम्स अॅाफ इंिडयाच्या चेअरमनच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले... बाबूजींचा हात हातात घेवून ते म्हणाले.... ‘दर्डाजी ये आपका बडप्पन हैं.’ त्यांनी स्वत: चहाचा कप उचलून बाबूजींच्या हातात दिला. आिण दरवाजापर्यंत बाबूजींना सोडयला आले. 

मोठी माणसं मनाने मोठीच असतात. अािण त्यांच्या प्रत्येक पावलात, प्रत्येक शब्दात त्या खुणा जाणवत असतात. २४ वर्षांच्या बाबूजींच्या सहवासातील या आठवणींनीच ८२ व्या व्ार्षी जगण्याची उमेद वाढलेली आहे. एकीकडे अत्रेसाहेब आिण दुसरीकडे बाबूजी सगळ्याच अर्थाने दोन टोकं आहेत. अत्रेसाहेब आिण बाबूजींची ही तुलना नाही... पण दोन्ही व्य्ाक्तिमत्त्वातला माणूस फार मोठा होता. 

फार मोठा होता.... माझ्यासारख्या छोट्या माणसाला आज जे मोठेपण मिळाले, ते या दोन व्यक्तिमत्त्वांमुळेच िमळाले, हे मी कसं विसरू शकेन....! अत्रेसाहेब म्हणाले होते, ‘काय वाट्टेल ते व्हा.. पण आयुष्यात कृतघ्न होवू नका....’

अत्रेसाहेब असतील, बाबूजी असतील मी हे निश्चितपणे सांगू शकतो.... मी या दोन्ही व्यक्तिमत्त्वांशी आयुष्यभर कृतज्ञा होतो... आहे आिण शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. 

- मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.