Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रात माती वाचवा आणि वृक्षलागवड अभियानाला गती मिळणार...

 महापालिका क्षेत्रात माती वाचवा आणि वृक्षलागवड अभियानाला गती मिळणार... 


: मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली एनजीओ आणि ब्रँड अंबेसिडर करणार प्रभावी नियोजन: 29 रोजी महापालिकेत माती वाचवा अभियानाबाबत कार्यशाळा


सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका माझी वसुंधरा, स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 रेस टू झिरो आणि आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत मनपाक्षेत्रात माती वाचवा, कंपोस्ट आणि वृक्ष लागवड ही अभियाने प्रभावीवणे राबविणार आहे. यासाठी मनपाचे ब्रँड अंबेसिडर आणि पर्यावरण प्रेमी एनजीओ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मनपाक्षेत्रात ही चळवळ प्रभावीपणे राबविली जाणार आहे .

महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे. यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मनपाच्या खुल्या भूखंडावर  वृक्षलागवड करण्याचे नियोजन एनजीओ कडून केले जात आहे. यासाठी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओकडून तशी तयारी दर्शविण्यात आली असून वृक्षलागवड करण्यासाठी बिरनाळे  कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे. 

माती वाचवा ही मोहीम अधिक गतीने राबविण्यासाठी शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जाऊन जनजागृती केली जाणार आहे. तसेच माती वाचवा ही मोहीम जनमानसात पोहचवण्यासाठी महापालिकेकडून नियुक्त ब्रँड अंबेसिडर डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन , अजितकुमार कोष्टी, स्मृती मानधना, संपदा पाटील, दीपक चव्हाण हेसुद्धा शाळा महाविद्यालयात जाऊन जनजागृती करणार आहेत. या सर्व अभियानासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनानुसार उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके,  आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांची टीम कार्यरत आहे. 

याच अंतर्गत बुधवार 29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता मनपा सभागृहात मनपा आणि खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी माती वाचवा अभियानाबद्दल अभ्यासक डॉ. अमित तगारे आणि डॉ. मुग्धा तगारे यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तर अनेक एनजीओ ओपन स्पेस दत्तक घेऊन त्यावर वृक्षलागवड आणि संवर्धन करण्यास पुढे आले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.