सांगलीत महापालिकेकडून योगा दिवस साजरा : महापौरांसह क्रीडा प्रेमींनी घेतला सहभाग
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून जागतिक योगा दिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. महिला बालकल्याण समिती आणि विश्वयोग मार्गदर्शन केंद्र मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हा योग दिन साजरा करण्यात आला. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील यांच्या उपस्थितीत योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या योगा प्रात्यक्षिकात महापालिकेचे उपायुक्त चंद्रकांत आडके, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेविका अनारकली कुरणे, सविता मदने , व्यापारी मनोहर सारडा , महादेव ढोपे पाटील, राहुल ढोपे पाटील, जोहेब मुजावर आणि नागरिक तसेच योग प्रेमींनी सहभाग घेतला होता. यावेळी योगाशिक्षक हर्षद गाडगीळ आणि टीमने सर्वाना योगाची माहिती दिली तसेच प्रात्यक्षिके करून घेतली. यामध्ये डॉ. श्रुती इरळे श्रद्धा इरळे, ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, श्रीधा वालवडकर, विद्याधर दांडेकर, राजेंद्र खंजिरे यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास परदेशातून सुद्धा अनेक योगप्रेमी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.