Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील नामांकित सीएच्या घर आफिसवर छापा

सांगलीतील नामांकित सीएच्या घर आफिसवर छापा


मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित आरटीओ अधिकाऱ्याशी संबंधाची चर्चा 

सांगली : परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका आरटीओ अधिकाऱ्याच्या मालमत्तेबाबत चौकशीसाठी सांगलीतील एका नामांकित सीएच्या घर व आफिसवर आज छापे टाकण्यात आल्याची सांगलीत चर्चा आहे. शुक्रवारी दुपारी हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. दरम्यान हे छापे पडल्याचे समजल्यानंतर सांगलीतील सीएंमध्ये खळबळ माजली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मंत्री आणि नेत्यांवर ईडी, इन्कम टॅक्स, डीआरआय अशा पथकाने छापे टाकले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका आरटीओ अधिकाऱ्याबाबत यापूवीर्च तक्रार केली आहे. त्यासाठी सोमय्या तासगावमध्येही येऊन गेले होते. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर त्या अधिकाऱ्याच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स, ईडी, डीआरआयच्या पथकांनी सांगली जिल्ह्यात छापे टाकले आहेत. 

आज त्या अधिकाऱ्याचे हिशोब पाहणाऱ्या एका सीएच्या आफिस आणि घरावर छापे टाकल्याची चर्चा आहे. या छाप्यांबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. रात्री उशीरापयर्त नेमकी कोणत्या एजन्सीने छापे टाकले याची माहिती मिळू शकली नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.