Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळाची पोलखोल भाग—२

माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळाची पोलखोल भाग—२


निवृत्त अधिकाऱ्याच्या नियुक्तीने मंडळाचे आथिर्क नुकसान 


सांगली : सांगली जिल्हा माथाडी तसेच सुरक्षा रक्षक मंडळाला निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यालाच मुदतवाढ दिल्याने तसेच दोन्ही मंडळाची दोन पदे दिल्याने मंडळाचे मोठ्या प्रमाणात आथिर्क नुकसान होत आहे. सध्या ज्यांच्याकडे दोन्ही मंडळांच्या निरीक्षक पदाचा कायर्भार दिला आहे ते २०१७ मध्येच निवृत्त झाले आहेत. शासनाने २०१६ मध्ये निवृत्त अधिकारी, कमर्चाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती करता येते. मात्र ती नियमित कामासाठी करू नयेत असेही शासनाचे आदेश आहेत. तरीही या निवृत्त अधिकाऱ्याकडे दोन्ही मंडळाच्या निरीक्षकपदाचा कायर्भार चार वषार्पासून दिल्याने आश्चयर् व्यक्त केले जात आहे.  

नियमित मंजूर पदांवर करार पध्दतीने नियुक्ती करता येणार नाही असाही शासनाचा आदेश आहे. परंतु त्यांची निरीक्षकपदी नियुक्ती केलेली आहे. वयोमानानुसार निवृत्त झालेल्यांना मुदतवाढ, पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये असेही आदेशात म्हटले आहे. तरीही माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या संबंधिताला निरीक्षक या पदावर मुदत वाढ देण्यात आलेली आहे. सुरक्षा रक्षक मंडळाचे कार्यालयीन कामकाजा करीता माथाडी मंडळातील कर्मचान्यांना अतिरीक्त कार्यभार देऊन सुरक्षा रक्षक मंडळाचे कामकाज करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. मग दोन मंडळे वेगळी दाखवण्याचे कारण काय ? याचे कारण असे की श्री मुलाणी यांना आपला फायदा करून घ्यायचा होता काय किंवा घेतला आहे काय ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.