Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या उर्मिला खोत यांनी जिद्दीने लढून मिळवला पोलिस उप निरीक्षकपद...

सांगलीच्या उर्मिला खोत यांनी जिद्दीने लढून मिळवला पोलिस उप निरीक्षकपद...


२०११ पासून चार ते पाच वेळा परीक्षा द्याव्या लागल्या. तरीही खचून न जाता सांगलीच्या उर्मिला खोत यांनी आज पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले. कौटुंबिक जबाबदारी, सर्वसामान्य परिस्थिती असतानाही त्यांनी हार न मानता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पती जीम ट्रेनर आणि १४ वर्षांची मुलगी असताना त्यांनी आपल्याला कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण करायचे या जिद्दीने परीक्षा दिल्या. 

प्रत्येक वेळी मैदानी चाचणीत पूर्ण गुण मिळाले, परंतु लेखी परीक्षेत एखाद-दोन गुणांमुळे त्यांना हुलकावणी मिळत गेली. अनेक संकटे आली. न्यायालयात धाव घ्यावी लागली, पण शेवटी अधिकारी होण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. सांगलीत हेडकॉन्स्टेबल म्हणून जबाबदारी पार पाडताना  त्यांनी चार वर्षांत टाकलेल्या पारधी धाडी संपूर्ण महाराष्ट्रात  चर्चेचा विषय ठरल्या. घरफोड्या, जबरी चोऱ्या, दरोड्यांतील ४ गुन्हेगारांना धडकी भरेल अशा त्यांच्या कारवायांमुळे सांगलीत  त्यांचा चांगलाच दबदबा आहे. वडील लष्करात नंतर पोलिसांत अन् आजोबाही लष्करात होते. त्यामुळे आपली मुलगी कर्मचारी नव्हे, तर पोलीस अधिकारीच व्हावी, अशी त्यांची इच्छा होती, व जी उर्मिला खोत यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

 अपयश ही यशाची पहिली पायरी म्हटली जाते. याचाच प्रत्यय पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षांतही आला. एखाद-दोन गुणांमुळे अधिकारी होण्याचे स्वप्न अर्धवट राहिल्यावर खचून न जाता एक-दोन वेळा नाही, तर चार ते पाच वेळा परीक्षा दिल्या, पण अधिकारी होऊन दाखवले. केवळ अधिकारीच नाही, तर उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी बन्त सन्मानही मिळवला. ही जिद्द अन् चिकाटीची कहाणी आहे सांगलीच्या उर्मिला खोतची .



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.