गावभाग सिद्धार्थ परिसर येथील नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन
गावभागातील सिद्धार्थ परिसर, रोहीदास नगर, ढवळे तालिम, हरिपूर रोड, कोल्हापूर रोडवरील या सर्व भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गेले अनेक वर्षे तारांबळ उडाली आहे सांगली शहरातील प्रमुख समजला जाणारा आणि नदी काठावरील भागांमध्ये बरेच नागरिक कष्ट करनारेपण गेले अनेक महिने त्यांना पाण्यासाठी रात्रीच्यावेळी उठून पाण्यासाठी कसरत करावी लागते याचे कारण अपुरा व कमी दाबाचा पाणी पुरवठा,या भागातील लोकांच्या चर्चातून असे कळते की नगरसेवक, नगरसेविकांनी मागासवर्गीय भाग पाण्यापासून वंचित ठेवून आपल्याच मतदारसंघात,भागात पाणी वळवल्याने सिद्धार्थ परिसर, रोहीदास नगर, हरिपूर रोड,पाटणे पलाॅट कोल्हापूर रोड, ढवळे तालिम,व अन्य भागाला जाणीवपूर्वक पाणि कमी केलेले दिसते आहे त्यामुळे मागासवर्गीय भागात पिण्याच्या पाण्याची तारांबळ उडाली आहे या भागातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवूले जात आहे.
आयुक्त साहेबांनी वेळीच लक्ष घालावे यासाठी आम्ही गावभागातील सिद्धार्थ परिसर रोहीदास नगर हरिपूर रोड, पाटणे पलाॅट कोल्हापूर रोडवरील, ढवळे तालिम परिसरमधील नागरिक यांनी "पाणीपुरवठा पुर्वी ज्या पध्दतीने केला जात होता त्याच पद्धतीने पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात यावा"या मागणीसाठी भारतीय ब्ल्यू पँथर च्या वतीने मोर्चा द्वारे निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय ब्ल्यू पँथर चे संस्थापक अध्यक्ष नितीन गोंधळे, कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर, सांगली जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ,बापू कोलप, बापू तासगावकर, प्रदीप कुदळे,,काजल (माळसा ) गोंधळे, छाया आनंदा गोधळे,छाया कुदळे,भारती कुदळे , महादेव नाईक, नितीन काळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.