माझी वसुंधरा, स्वच्छ सर्व्हेक्षण , आझादी का अमृतमहोत्सव
माझी वसुंधरा, स्वच्छ सर्व्हेक्षण , आझादी का अमृतमहोत्सव आणि रेस टू झिरो अंतर्गत आज महापालिकेत माती वाचवा या विषयावर अभ्यासक डॉ. अमित तगारे आणि मुग्धा तगारे यानी मनपाक्षेत्रातील प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना माती वाचवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात माती वाचवा अभियान हे प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्त नितीन कापडणीस यानी घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही भारतातील पहिली महापालिका आहे. या अभियानाची जनजागृती व्हावी यासाठी महापालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच माती वाचवण्यासाठी काय काय उपक्रम हाती घ्यायचे आहेत याचे सविस्तर मार्गदर्शन
अभ्यासक डॉ. अमित तगारे आणि मुग्धा तगारे यानी सर्वाना दिले. तसेच प्रत्येक शाळातील विद्यार्थ्यांना या अभियानात सहभागी करून घेऊन माती वाचवण्यासाठी त्यांचाही सहभाग घेण्याचे आवाहनही अभ्यासक डॉ. अमित तगारे आणि मुग्धा तगारे यानी केले. या वेळी आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, महापालिकेचे ब्रॅण्ड अंबेसिडर दीपक चव्हाण, सेव्ह सोईलचे , देवांग शहा, अमृता पाटील यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.