Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीचे नाव महाराष्ट्रात करणाऱ्या प्रगती पॅनलला बहुमताने विजयी करा - राज्य प्रवक्ता संतोष पाटील.

 सांगलीचे नाव महाराष्ट्रात करणाऱ्या प्रगती पॅनलला बहुमताने विजयी करा - राज्य प्रवक्ता संतोष पाटील.

वसंतदादा सहकारी बँकेच्या नंतर महाराष्ट्रात सांगली चे नाव सर्वत्र करणाऱ्य सांगली अर्बन  को-ऑपरेटिव बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये येत्या 26 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले  प्रगती पॅनलच्या सर्व संचालकांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आव्हान राज्य प्रवक्ता संतोष पाटील यांनी प्रचाराच्या वेळेला वक्तव्य केले. 

पुढे ते म्हणाले की मागील दोन वर्षात कोव्हीड मुळे अनेक उद्योगधंदे बंद पडल्यामुळे व मार्केटमध्ये उलाढाल कमी झाल्यामुळे अनेक व्यवसाय मोडीत निघाले परिणामी लोकांचा अर्थचक्र बिघडले मराठवाड्यात अनेक ठिकाणी पडलेला दुष्काळ तसेच सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र मध्ये आलेला महापूर यामुळे लोकांचे आर्थिक चक्र थांबले होते, परंतु अशा परिस्थितीतही सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन व संचालक मंडळाने बँकेला नवी उभारी दिली व नवनवीन योजना राबवून बँकेला नफ्यामध्ये आणले.सांगली शहरांमध्ये प्रत्येक सभासदाच्या घरी जाऊन उमेदवाराची ओळख करून नारळाच्या चिन्ह समोर शिका मारून त्यांना निवडून द्यायचे आव्हान केले.

 यावेळेला विद्यमान संचालक मा रणजीत (भैय्या) चव्हाण, मा शैलेंद्र तेलंग, बँकेचे माजी संचालक मा रमेश (आण्णा) चव्हाण, सुधाकर नार्वेकर, चंद्रकांत मालवणकर,आनंदा चिकोडे, सहदेव रोडे, गणेश कल्याणकर, व अनेक सभासद व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.