Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हॉटेल आस्थापनांना हायजिन रेटींग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा

हॉटेल आस्थापनांना हायजिन रेटींग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा


सांगली, दि. 29,  : सांगली जिल्ह्यातील हॉटेल आस्थापनांना स्वच्छतेबाबत थर्ड पार्टीकडून ऑडीट करून हायजिन रेटींग प्रमाणपत्र प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे घेण्यात आली. ही कार्यशाळा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्यासमवेत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती हिरेमठ व श्री. स्वामी यांनी घेतली.

या कार्यशाळेमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील शेड्युल 4 मधील स्वच्छतेबाबत घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती हिरेमठ व श्री. स्वामी यांनी मार्गदर्शन केले. हायजिन रेटींग हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती हॉटेल आस्थापनांना यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेत तळण्यासाठी वापरण्यात येत असलेले तेल किती वेळा वापरावे व असे वापरून शिल्लक राहिलेले तेल रूको या संस्थेला देण्याबाबत मार्गदर्शन केले. रूको ही संस्था जळके तेल घेवून बायोडिझेल निर्मिती करीत असल्याबाबतचे त्यांना अवगत केले. वापरलेले तेल एका कंटेनरमध्ये साठवूण त्यावर रूकोचे लेबल लावण्याबाबत सूचना दिल्या.

या कार्यशाळेत ईट राईट चॅलेंजच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यात मिरज लक्ष्मी मार्केट येथील रोडवर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांना क्लिन स्ट्रिट फूड हब चे मानांकन प्राप्त झाल्याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.