Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्रेडिट आउटरीच मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील बँकांतर्फे आज मेळावा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

क्रेडिट आउटरीच मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील बँकांतर्फे आज मेळावा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन


सांगली, दि. 7,  : भारत सरकार वित्त मंत्रालय व राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार दि. 6 ते 12 जून 2022 हा सप्ताह आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या “ग्राहक जनसंपर्क अभियान” अंतर्गत “आइकॉनिक सप्ताह“ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत सांगली शहरामध्ये सर्व बँकेच्या सक्रिय सहभागातून अग्रणी जिल्हा कार्यालय, सांगली यांच्यावतीने दि. 8 जून 2022 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत “क्रेडीट ऑउटरिच कॅम्पचे पद्मविभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुख्य कार्यालय, सांगली येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महेश हरणे यांनी केले आहे.

या मेळाव्यास सांगली जिल्ह्यातील  सर्व बँक व इतर शासकीय विभागाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये आलेल्या व्यक्तींना बँकेच्या विविध योजनांची माहिती देणे व लाभार्थीना मंजुरीपत्र वाटप करणे, आर्थिक साक्षरता समुपदेशन, विविध जनसुरक्षा योजनांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखा, व्यवसाय समन्वयक (BC), अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कृत करणे इत्यादीचे प्रयोजन असल्याचे श्री. हरणे यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.