तांत्रिक बागवान यानेच घेतले नऊ जनाचे बळी! काळ्या चहात घातले विषारी द्रव्य
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे ब्लॅक टीमधून विषारी औषध देऊन काटा काढण्यात आला. यातील मुख्य संशयित असलेल्या अब्बास बागवान याच्या वडिलांची आणि वनमोरे बंधूंची पैशांचा पाऊस पाडण्यातून ओळख झाली होती. चार ते पाच वर्षात लाखो रूपये देऊनही बागवान याने पैशांचा पाऊस पाडला नाही. त्यामुळे वनमोरे बंधूंनी अब्बासच्या वडिलांकडे तगादा लावला होता. त्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठीच तीर्थ म्हणून ब्लॅक टीमधून त्यांना विषारी द्रव्य देऊन त्यांचा काटा काढला असावा अशी चर्चा आहे.
संशयित अब्बास याच्या वडिलांची आणि वनमोरे कुटुंबाची नेमकी ओळख कशी झाली हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र वनमोरे बंधू मोहम्मदअली बागवान यांच्या संपर्कात होते. ते बर्याचदा म्हैसाळ येथील वनमोरे बंधूंच्या घरीही येऊन गेले होते. असलेल्या त्यांच्या जुन्या घरातून गुप्तधन काढून देतो असे म्हणून मोहम्मदअली बागवान यांनी त्यांच्याकडून लाखो रूपये उकळले होते. पैसे देऊन बरीच वर्षे झाली तरी बागवान त्यांना गुप्तधनही काढून देत नव्हते शिवाय पैशांचा पाऊसही पडत नव्हता.
बागवान यांना देण्यासाठी वनमोरे बंधूंनी अनेक ठिकाणाहून कर्ज घेतले होते. त्यांचा तगादा लागल्यानंतर आणि गुप्तधन नाही, पैशांचा पाऊसही पडत नसल्याने ते काळजीत होते. गेल्यावर्षी मोहम्मदअली बागवान यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या वनमोरे बंधूंनी त्यांचा मुलगा अब्बासकडे पैशांसाठी तगादा लावला होता. पैसे मागण्यासाठी ते दोघे अनेकदा सोलापूरलाही जाऊन आले होते. वनमोरे बंधूंच्या तगाद्याला वैतागूनच अब्बासने त्यांचा कायमचा काटा काढला असावा अशी शक्यता व्यक्त जात आहे.
सायनाईडपेक्षाही तीव्र विषारी औषध
संशयित अब्बास आणि त्याचा सहकारी धीरज सुरवशे दि. 19 रोजी वनमोरे यांच्या घरी एका कारमधून आले होते. रात्री उशीरा त्यांनी दोन्ही कुटुंबातील सर्वांना ब्लॅक टीमधून विषारी औषध दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान चव, वास रंगहीन असणारे विषारी औषध त्यांनी त्या ब्लॅक टीमध्ये होते. शिवाय तो ब्लॅक टी ते बाहेरून घेऊन वनमोरे यांच्या घरी गेले होते. यावेळी वापरण्यात आलेले विषारी औषध सायनाईडपेक्षाही तीव्र असावे असा वैद्यकीय सूत्रांना संशय आहे.
ध्यानधारणेच्या कारणाने बसवले वेगवेगळ्या खोल्यांत
संशयित अब्बास आणि त्याच्या साथीदाराने बाहेरून आणलेल्या ब्लॅक टीमध्ये विषारी औषध मिसळले होते. त्यानंतर त्यांनी तो चहा म्हणून त्यांना पिण्यास दिला. त्यावेळी तीर्थ घेतल्यानंतर ध्यानधारणा करा असे सांगत कुटुंबातील सर्वांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवले. त्यावेळी अस्वस्थ वाटल्यास किंवा काही त्रास झाल्यास आवाज केला तर पडणार्या पैशांचा कोळसा होईल अशी भीतीही घातली असावी अशी चर्चा आहे.
चिठ्ठ्यांचे गूढ कायमच
वनमोरे बंधूंच्या खिशात मृत्यूपूर्व लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या पोलिसांना आल्या होत्या. त्यामध्ये काही नावांतील फरक वगळता अन्य मजकूर सारखाच असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या चिठ्ठ्या हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवल्या आहेत. मात्र त्या चिठ्ठ्या नेमक्या कोणी लिहिल्या याबाबतचे गूढ अद्यापही कायम आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.