म्हैसाळ सामुदायिक आत्महत्येप्रकरणी महिलेसह १३ जणांना अटक
२५ जणांविरोधात गुन्हा, सावकारीला कंटाळून वनमोरे कुटुंबाने संपवले जीवन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची माहिती
सांगली: मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी मृतांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून एकूण २५ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह बेकायदा सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह १३ जणांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नंदकुमार पवार (वय ५२, रा. म्हैसाळ), राजेंद्र बन्ने (वय ५०, रा. नरवाड), अनिल बन्ने (वय ३५, रा. नरवाड), खंडेराव शिंदे (वय ३७, रा. म्हैसाळ), डॅ. तात्यासो चौगुले (वय ५०, रा. म्हैसाळ), शैलेश धुमाळ (वय ५६, रा. म्हैसाळ), प्रकाश पार (वय ४५, रा. बेडग), संजय बागडी (वय ५१, रा. म्हैसाळ), अनिल बोराडे (वय ४८, रा. म्हैसाळ), पांडुरंग घोरपडे (वय ५६, रा. म्हैसाळ), शिवाजी कोरे (वय ६५, रा. म्हैसाळ), रेखा चौगुले (वय ४५, रा. म्हैसाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याशिवाय आशु धुमाळ, अनाजी खरात, शामगोंडा पाटील, सतीश शिंदे, शिवाजी खोत, गणेश बामणे, शुभदा कांबळे, विजय सुतार, नंदकुमार धुमाळ, राजेश होटकर, आण्णासो पाटील, नरेंद्र शिंदे, महादेव सपकाळ यांच्यावरही मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.
अधीक्षक गेडाम म्हणाले, मृत पोपट वनमोरे, डॅ। माणिक वनमोरे यांनी मृत्यूपूवीर् लिहिलेल्या चिठ्ठीत सवर् संशयितांची नावे होती. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी कजर्बाजारीपणाला कंटाळून सामुदायिक आत्महत्या केली आहे. त्यांशी कशासाठी कजर् घेतले होते. कोणाकडून घेतले होते तसे किती रूपयांचे कजर् घेतले होते याबाबत तपास सुरू आहे. त्यांनी कजार्ऊ घेतलेल्या रकमेचे काय केले याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे. गुप्तधन अथवा जादूटोणा यासाठी पैशांचा वापर केला का याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे. घटनेचे गांभीयर् पाहून हा तपास मिरजेचे पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिल्याचेही गेडाम यांनी यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.