कर्मवीर पतसंस्थेस रावसाहेब पाटील यांची सदिच्छा भेट
सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन मुख्यालयास दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व अरिहंत सौहार्द को ऑप क्रेडीट सोसायटी लि बोरगाव चे संस्थापक अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी कर्मवीर पतसंस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या स्वागतामध्ये मांडला. महाराष्ट्र आणि विशेषतः कर्नाटक राज्यामध्ये मा. रावसाहेब आ. पाटील यांनी सहकारामध्ये आदर्श काम करुन अनेक संस्था नावारुपाला आणल्या असून सहकार उद्योग व्यापार साखर शिक्षण या क्षेत्रात हजारो हाताना काम दिले आहे. मा. रावसाहेब आ. पाटील यांचा आदर्श घेण्यासारखा असून आम्ही ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या मनोगतात सभेचे अध्यक्ष रावसाहेब आ. पाटील यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली व संस्थेने बांधलेले मुख्य कार्यालय आदर्श असून अनेक संस्थाना भविष्यामध्ये दिपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी आपल्या मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भेटीवेळी त्यांनी कर्मवीर पतसंस्थेच्या कार्यालयाची भरभरून स्तुती केल्याची आठवण आपल्या मनोगतात सांगितली व संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष व उद्योजक श्री. भालचंद्र पाटील व दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित जनगोंडा पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी अॅड. जयंत नवले व सांगली अर्बन बँकेचे संचालक संजय परमणे उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू. डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. ओ. के. चौगुले (नाना). श्री. लालासाहेब भाऊसो थोटे, तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके) डॉ. अशोक आण्णा सकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते. आभार संचालक अॅड. एस. पी. मगदुम यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.