उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले..
मुंबई, 22 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारीच एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवलं आहे.पण, उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले आहे. त्यांनी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला पोहोचले आहे. सर्व आमदारांना एकत्र बैठक घेऊन एकमताने गटनेता निवडायचा असतो ही पद्धत आहे. बहुमताचा आकडा जो आहे, तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांची निवड ही अवैध ठरू शकते, हा तांत्रिक मुद्दा आहे' असं म्हणत शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्ही 40 आमदार सोबत आहे.
आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत' असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मिलिंद नार्वेकर आले होते, त्यांना मी भेटलो.
तुम्ही एकीकडे माणसं बोलण्यासाठी पाठवली आहे आणि दुसरीकडे मला गटनेतेपदावरून हटवलं. माझे पुतळे जाळले जात आहे. मी याआधी सुद्धा उद्धव ठाकरे यांना आमदारांची भूमिका समजावून सांगितली होती. पण बोलणी सुरु असताना मला गटनेतेपदावरून हटवलं. त्यामुळे मी आमदारांशी बोलून पुढील निर्णय घेईल असं सांगितलं, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. (एकनाथ शिंदेंवर पक्षातर्गत कारवाई होणार का? किती आमदार आहेत शिंदेंकडे) मी आजही बाळासाहेबाचा कट्टर शिवसैनिक आहे, शिवसैनिक राहणार आहे. आनंद दिघे यांचे विचार आणि प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
काल आज आणि उद्या आम्ही शिवसैनिकच असणार आहोत. आमची सुरुवात ही हिंदुत्वाची होती. यात कोणतीही तडजोड करणार नाही., आम्ही कोणत्याही आमदारांना जोरजबरदस्तीने आले नाही. स्वखुशीने हे आमदार आले आहे. 40 पेक्षा जास्तीचे आमदार आज माझ्यासोबत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आली आहे,असं एकनाथ शिंदे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.