Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रखडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करण्याचे दत्तात्रय भरणेंना निवेदन

 रखडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करण्याचे दत्तात्रय भरणेंना निवेदन


मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमित बदल्या करण्यास मान्यता दिली असतानाही प्रशासनाकडून अद्याप तसा आदेश काढला नसल्याने पेच निर्माण झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

करोनामुळे रखडल्या बदल्या - २०२०-२१ मधील नियमित बदल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास रद्द करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या वर्षातही कमी अधिक प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. त्यामुळे शंभर टक्के बदल्या न करता अगदी काही प्रमाणातच बदल्या करण्यात आल्या होत्या. यावर्षी गोल्या दोन वर्षांच्या तुलनेत करोना साथ नियंत्रणात आली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या १००% नियमित बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.

३० जून पर्यंत बदल्या कराव्यात! - साधारण दरवर्षी ३१ मे पर्यंत बदल्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाते. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात मुंबईत होत असून, सरकारी अधिकाऱ्यांच्या कौटुंबिक व आरोग्यविषयक समस्या यांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी अधिकाऱ्यांनी बदलीच्या नवीन ठिकाणी स्थिरावण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन, आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील नियमित व प्रशासकीय बदल्या ३० जून अखेरपर्यंत प्राधान्याने करण्यात याव्यात, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे आणि महासंघाचे सल्लागार ग दि कुलथे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सध्या राज्यात राजकीय अस्थिरता पहायला मिळत आहे. महविकास आघाडीमधील महत्तवाचा घटकपक्ष असेलल्या शिवसेनेचे अनेक मंत्री, आमदार फूटले आहेत. त्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष राजकीय घडामोडींकडे लागले आहे. अशात राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन कसे होईल हे पहाव लागेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.