Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रात विनापरवाना डिजिटल लावल्यास थेट फोजदारी गुन्हा दाखल होणार

महापालिका क्षेत्रात विनापरवाना डिजिटल लावल्यास थेट फोजदारी गुन्हा दाखल होणार


महापालिका क्षेत्रात विनापरवाना डिजिटल लावल्यास थेट फोजदारी गुन्हा दाखल होणार : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचा इशारा : फलक लागल्यास महापालिकेला कळवा


सांगली : महापालिका क्षेत्रात विनापरवाना डिजिटल लावल्यास संबंधितांवर शहरांचे विद्रुपीकरण केल्याबद्दल फोजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना जनहित याचिका क्र. १५५/२०११ च्या अनुषंगाने जाहीर सर्व नागरिक तसेच राजकीय पक्ष, राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस, राजकीय व्यक्तींची एखाद्या पदावरील नियुक्ती, राजकीय नेत्यांचे / मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी विविध सणानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व त्याप्रसंगी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, फलक, डिजीटल फ्लेक्स, कमानी इत्यादीबाबत संबंधित यंत्रणाकडून कार्यवाही होत नसल्याबाबत मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. 

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सार्वजनिक रस्त्यावरील अथवा शासकीय, खाजगी जागेतील अनधिकृत / विना परवाना बॅनर्स, पोस्टर्स, फलक, डिजीटल फ्लेक्स, कमानी इत्यादीवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी  सहा. आयुक्त, प्रभाग समिती क्र. १ ते ४ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे विनापरवाना फलक उभारल्यास मालमत्ता व्यवस्थापक तथा सहायक आयुक्त नितीन शिंदे यांना ९८५०२२८८३३ यांना प्रभाग समिती क्र. १ करिता तर  श्री. एस. एस. खरात (सहा. आयुक्त, प्रभाग समिती क्र. २ साठी) ९९२२४९६०२६ वर तर श्री. दत्तात्रेय गायकवाड (सहा. आयुक्त, प्रभाग समिती क्र. ३ व ४ साठी) ९०९६५५८५४४ या नंबरवर कळवावे. 

मनपा क्षेत्रात कोणीही विना परवाना बॅनर्स, पोस्टर्स, फलक, डिजीटल फ्लेक्स, कमानी इ. लावू नयेत. अन्यथा संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. नागरिकांनी मनपा क्षेत्रात कोणतेही अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, फलक, डिजीटल फ्लेक्स, कमानी निदर्शनास आल्यास वर नमूद केलेल्या नोडल अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे, एस.एम.एस. द्वारे, व्हॉटस्अॅपद्वारे तसेच महानगरपालिकेचे टोल फ्री क्रमांक १८००२३३ २३७४ व १८००२३३ २३७५ यावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.