Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिव्हिल समोरील व्यावसायीकांची अतिक्रमणे महापालिकेने हटविले...

सिव्हिल समोरील व्यावसायीकांची अतिक्रमणे महापालिकेने हटविले...


: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 2 ची कारवाई: सिव्हिल रोडने घेतला मोकळा श्वास


सांगली : सिव्हिल समोरील असणारी व्यावसायीकांची अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने मंगळवारी हटविली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 2 ने ही कारवाई केली.या कारवाईमुळे  सिव्हिल रोडने मोकळा श्वास घेतला आहे.

    सांगली सिव्हिल हॉस्पिटल ते गारपीर रस्त्यावर असणाऱ्या खोक्याच्या बाहेर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली होती. अनेक खोक्याबाहेर बोर्ड, अन्य साहित्य मांडल्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या संख्येत वाढ झाली होती. याबाबत मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी सदरची अतिक्रमणे काढण्या बाबतचे आदेश दिले होते. 

यानुसार आज सहायक आयुक्त एस. एस. खरात यांच्यासह स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, अंजली कुदळे, मुकादम वैभव कांबळे आणि अतिक्रमण विभागाकडून संयुक्त मोहीम राबवित या मार्गावरील रस्त्यावरचे छोटे बोर्ड आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले. यामुळे अतिक्रमनात सापडलेल्या या मुख्य मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. या मार्गावरील व्यावसायिकांना पुन्हा अतिक्रमण करू नये याबाबत सूचना देण्यात आल्या असून या मार्गावर पुन्हा अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सहायक आयुक्त एस एस खरात यांनी दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.