सध्या सर्वच इन्शुरन्स कंपन्या या महापूर जिथं येतो....
सध्या सर्वच इन्शुरन्स कंपन्या या महापूर जिथं येतो,किंवा पाणी आल्याने होणाऱ्या नुकसानी बाबतीत हात वर करत आहेत,केले आहेत, पूर्वी 2019 आणि त्या नंतरही क्लेम देताना यांनी अतोनात त्रास दिलेला आहे,अनेक कागदपत्रे आणि प्रक्रिया पार पडल्यानंतर अगदी तुटपुंजी रक्कम यांनी मंजूर केल्या आहेत,आणि आतातर तेही देणार नाही म्हणून लेखी देत आहेत,पण प्रीमियम मात्र तेवढाच किंबहुना जास्त घेत आहेत,
सदर बाबतीत मा.मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने लक्ष घालून सदर सर्व प्रकार थांववण्याचे आदेश पारित होणे आवश्यक आहे, आधी महापूर-लॉकडाऊन-परत महापूर आणि आता परत महापुराच्या उंबरठ्यावर सांगलीची बाजारपेठ उभी आहे. मागील सर्वच अडचणींच्या काळात राज्यसरकार आणि स्थानिक प्रशासनाने कोणतीही भरीव मदत व्यापारी समाजास केली नाही,केली ती चेष्टा फक्त, नुसत्या घोषणा,जाहिराती आणि राजकारण या पलीकडे काहीही नाही,
स्थानिक प्रशासन पुरपट्ट्याच्या लोकांना नोटीस देत आहेत,घर सोडा,सामान हलवा, आमची जवाबदारी नाही,आणि तसं नाही केलं तर कारवाही करू,हे किती हास्यास्पद आहे,हे प्रशासनाने जरा चिंतन करून पाहावं,
सरकार कर घेते की नाही?
आणि त्या बद्दल तुमचं दायित्व काय?
जर प्रशासन मदत देत नसेल, तेवढी त्यांची क्षमता नसेल तर निदान या इन्शुरन्स कंपन्यांना पूर्वी नुसार क्लेम देण्याचे आदेश सरकारने द्यावेत,व गेली कित्येक वर्षे व्यापारी प्रीमियम भरत आहेत,त्याचं काय?हा प्रश्न विचारावा,
जर नुकसानभरपाई द्यावी लागल्यावर हात वर करत असतील तर इन्शुरन्स कंपन्यांचा उपयोग काय?
कुणीही उठावं आणि व्यापारी समाजाचं शोषण करावं,हे आता नियमित आहे,इथं आमची बाजू घेऊन सरकार मध्ये जाब विचारणारे कोणीच नाही हे मोठे दुर्दैव आहे, आज सांगलीतील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी ,आमदार,खासदार,महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, यांनी स्वतः आत्मचिंतन करून आम्हास सांगावं,की गेल्या 10 वर्षात बाजारपेठेत किती दुकानं नवीन सुरू झाली?बाजारपेठ किती विस्तारित झाली?किती नविन उद्योग आले?असेल तर उत्तर पुराव्यासाहित द्यावं,नवीन सुरू व्हायचं तर लांबच पण आहे त्यातील सुद्धा व्यवसाय बंद झाले,होत आहेत,हा प्रकार म्हणजे लोकप्रतिनिधींचे अपयश म्हणावं की काय?आमच्याकडे आता हे मोजायची फुटपट्टी उरली नाही, आमचं या माध्यमातून सत्ताधारी सरकार,स्थानिक लोकप्रतिनिधी यांना अवाहन आहे,सदर इन्शुरन्स कंपन्यांना समज देऊन सरळ मार्गाने क्लेम देण्यास आदेश द्यावेत,अन्यथा भरीव मदत व्यापारी समाजासाठी जाहीर करावी,
व्यापारी एकता असोसिएशन
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.