तीव्र भूकंपाने हादरला अफगाणिस्तान... १५५ ठार
काबुल: अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार माजवला आहे. पहाटेच्या भूकंपात 155 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानातही जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात होता.
भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो. अफगाणिस्तानातील भूकंप यापेक्षा कमी तीव्रतेचा होता. पाकिस्तानी मीडियानुसार, इस्लामाबादसह इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सोशल मीडियावरही लोक भूकंपाबद्दल बोलत आहेत. लोकांनी लिहिले की, भूकंपाचे हे धक्के काही सेकंदांसाठी जाणवले. मात्र यामुळे लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. यापूर्वी शुक्रवारीही पाकिस्तानात भूकंप झाला होता. त्यानंतर इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये हे धक्के जाणवले. फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडी येथेही हे धक्के जाणवले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.