Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंची कायदेतज्ज्ञांशी चर्चा

 राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंची कायदेतज्ज्ञांशी चर्चा


महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकार पडलं तरी भाजप सरकार स्थापन करणार नाही, अशी शक्यता आहे. तर शिंदे गटाला भाजपात घेऊन निवडणूक लढवणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे.

राजकीय पेचप्रसंगावर दीड ते दोन तास मंथन झाले आहे. गुवाहाटीतील हॉटेलमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना गटात शिवसेनेचे 38 आमदार आहेत. एकनाथ शिंदेंनी काल गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लू मधून बाहेर पडत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. काल दुपारी साडेबाराच्या सुमारास एकनाथ शिंदे अचानक हॉटेलमधून बाहेर पडले. ते मुंबईसाठी रवाना झाल्याची चर्चा रंगली. अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. कामाख्या मंदिरात दर्शनासाठी गेल्याचीही चर्चा रंगली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी राजकीय पेचप्रसंगावर कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर ते पुन्हा एकदा हॉटेलमध्ये परतले.

त्याचवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार मेळाव्यातून पुढे न्या, आपण शिवसेनेतच आहोत. आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करा. सगळ्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवा असं एकनाथ शिंदे म्हणालेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे गट प्रवक्त्यांची नेमणूक करणार आहेत. प्रवक्ता गटाची भूमिका माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहचवणार आहेत. प्रवक्ते नेमणुकीचा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. जनतेपर्यंत गटाची भूमिका पोहोचवण्यासाठी प्रवक्ता नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.