महापालिकेकडून पर्यावरण दिनी मान्यवरांचा सन्मान
महापालिकेकडून पर्यावरण दिनी मान्यवरांचा सन्मान : महापालिकेला मिळालेले यश हे जनतेचे : आयुक्त नितीन कापडणीस यांचे गौरवोद्गार पंचतारांकित घरे, पर्यावरण दूतांचा सन्मान , ब्रँड अंबेसिडरची झाली नियुक्ती 100 वर्षांपूर्वीच्या वृक्षाचा झाला वाढदिवस साजरा
सांगली : महापालिकेकडून पर्यावरण दिनी पर्यावरण आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये माझी वसुंधरा स्पर्धेत महापालिकेला मिळालेले यश हे जनतेचे असल्याचे गौरवोद्गार मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी काढले. यावेळी आयुक्त कापडणीस यांच्याहस्ते पंचतारांकित घरे, पर्यावरण दूतांचा सन्मान करण्यात अलका तर ब्रँड अंबेसिडरची नियुक्ती करीत त्यांना सत्कारही करण्यात आला. यावेळी 100 वर्षांपूर्वीच्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रारंभी पर्यावरण दिनानिमित्त आमराईमधून वृक्षादिंडी काढण्यात आली. यावेळी मनपा अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यानंतर आयएमए हॉलच्या परिसरात सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अभाळमाया फौंडेशनचे प्रमोद चौगुले, डॉ अजित मेहता, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पर्यावरण दूत म्हणून काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला तर पंचतारांकित घरे म्हणून महापालिकेने निवड केलेल्या कुटुंबाचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
यावेळी महापालिकेचे ब्रँड अंबेसिडर म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ दिलीप पटवर्धन आणि सौ. माधवी पटवर्धन , सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, कंपोस्टसाठी नियुक्त केलेल्या संपदा पाटील, आणि अभिनेते उमाकांत पाटील यांच्या पालकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महापालिकेचा माझी वसुंधरामध्ये आलेला दुसरा क्रमांक हा लोकसहभागामुळे आला आहे. महापालिकेला मिळालेला सन्मान हा माझा एकट्याचा नसून समस्त जनता, सर्व एनजीओ, स्वच्छता दूत, सामाजिक कार्यकर्ते आणि मनपाचे सर्व अधिकारी स्वच्छता कर्मचारी आणि नागरिकांचा असल्याचा गौरवोद्गार मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी काढले. तसेच महापालिकेच्या अभियानात असेच नागरिकांनी यापुढेही सहभागी व्हावे असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, सावता खरात, नकुल जकाते, वैभव वाघमारे, विजय पवार आदींनी केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.