मधुकर भावे - उद््धवस्त महाराष्ट्राला वाली कोण?
अशा अवस्थेत सारा महाराष्ट्र होरपळून चालला असताना तिकडे मेघालयातील चेरापुंजीत देशाच्या संपूर्ण मोसमातील अर्धा पाऊस कोसळून गेला. इकडे महाराष्ट्रात सरकार कोसळल्यात जमा आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत कधीही झाले नाही, असे राजकीय धिंगाणे सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोप, आमदारांची पळापळ, सरकार जागेवर नसणे, सारे काही महाराष्ट्राला पार बदनाम करून टाकणारे घडले आहे. पुढे काय होईल, कोणाला सांगता येत नाही. सत्तेच्या साठमारीत सत्तेवर कोण येईल? याचे भविष्य वर्तवता येत नाही. कोणीही आला तरी आता महाराष्ट्राची विस्कटलेली घडी आिण उद्धवस्त झालेला शेतकरी, याला सावरण्याची कुवत असलेला नेता आता महाराष्ट्रात शिल्लक नाही. सगळे सत्तेभोवती आणि त्यातून िमळवायच्या पैशांभोवती रिंंगण घालणारे आहेत. आषाढी एकादशी जवळ आल्यामुळे आळंदी- देहूतून ज्ञाानोबा- तुकोबांच्या पालख्या पंढरपूरकडे निघाल्या.
या कठीण परिस्थितीतही करपवणारे ऊन अंगावर झेलून लाखो लोक या वारीत होते. महाराष्ट्राच्या एकाही वृत्तवािहनीला भक्तीच्या रिंगणाची, या परंपरेची थेट दखल घ्याचीशी वाटली नाही. वािहन्यांचे कॅमेरे सूरत, गुवाहटीला पोहोचले. ए.बी.पी. माझा तर जाहिरातच करत राहीले की, आमचा माणूस सुरत येथे पोहोचलाय..... पण आळंदी, देहू ,पंढरपूरला पोहोचावे, असे कोणालाच वाटले नाही. महाराष्ट्र भलतीकडेच िनघाल्याची ही लक्षणे आहेत. आता या महाराष्ट्राला कोणी सावरू शकेल, अशी स्थिती नाही. राजकीय पक्ष विकलांग झाले आहेत. केंद्रात बसलेला भाजपा पक्ष मिळेल त्या मार्गाने एक-एक राज्य पाडण्याच्या मागे आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने बेफिकीरीमुळे सरकार कोसळेपर्यंत वेळ आली. वृत्तपत्रांत निवेदने दिली जात होती... ‘महाआघाडीचे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल....’ पण, ही निवेदने करणाऱ्यांच्या डोळ्यासमोर राज्याच्या ग्रामीण गृहमंत्र्यांसोबत ३५ आमदार पळाल्याचे समजलेसुद्धा नाही... या मंत्र्यांनी आपली सुरक्षा व्यवस्था परत पाठवून दिली. तेही मुख्यमंत्र्यांना कळले नाही. सगळे विधानसभेत बसलेले आहेत. विधान परिषदेचे मतदान आटोपले आहे... आिण ३५ आमदार ठाण्याच्या महापौरांच्या बंगल्यावर जेवण करून सुरतेकडे निघाले.... राज्य चालवताना जो चाणक्षपणा लागतो, सावधपणा लागतो, त्याचा पूर्ण अभाव आिण हे का घडले, हे समजून न घेण्याची भूमिका, यातून महाराष्ट्रात अराजक निर्माण झाले. सत्तेवर असलेले आिण सत्तेतून पळालेले दोघेही या भयानक परिस्थितीला, आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडण्याला जबाबदार आहेत.
याही स्थितीत महाराष्ट्रातील जनता हे सगळे राजकीय भयानक नाट्य विनोदाने घेत होते. त्यामुळेच हे चार िदवस थोडे सुसह्य झाले. ‘पंतप्रधान मोदी तुकोबांच्या भेटीला देहूला आले आिण एकनाथाला घेवून पळाले...’ ‘या आषाढीला आता माझी पूजा कोणता मुख्यमंत्री करणार? असा प्रश्न पंढरपूरचा विठुराया विचारतोय....’ अशा हलक्या-फुलक्या विनोदांनी िदवस ढकलले जात होते. पण हे तात्पुरते विनोद आहेत. त्या विनोदाने क्षणभर हसू आल्यावर महाराष्ट्राची गंभीर राजकीय परिस्थिती बदलत नाही, असे विनोद पावला-पावलावर होतात. माझ्या एका मित्राने गाडी घेतली... शोरूममध्ये ती गाडी बघायला गेलो, ‘होंडा अमेझ...’ गाडी घेणाऱ्याने विचारले ‘डिकी मोठी आहे का?’ शोरूमच्या माणसाने डिकी उघडून दाखवली. ‘खूप मोठी िडकी आहे’. तो किती विनोदी होता... डिकी उघडताना तो म्हणाला... ‘दोन आमदार सहज बसून, गुवाहटीपर्यंत जावू शकतील....’
या सगळ्या विनोदानंतरही महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीचे सत्य अितशय भयानक आहे. सगळा महाराष्ट्र होरपळत आहे. ग्रामीण भागात सर्वच िठकाणी पुन्हा पेरण्या करण्याची वेळ आलेली आहे. महागाई भडकलेली आहे. रोजचे जीवन कठीण झालेले आहे. आिण राज्य चालवण्याच्या महत्त्वकांक्षी लोकांचे मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. सत्तेच्या साठमारीसाठी पैशांचा धबधबा आहे आिण महाराष्ट्रातील गरीब शेतकरी उद्याचा िदवस िकती अवघड आहे... पुन्हा पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे? या विवंचनेत आहे. सगळीच परिस्थिती हाताच्या बाहेरची आहे. आिण उद्या राज्याची घडी पुन्हा नीट कोण बसवू शकेल, त्या नेत्याच्ाा चेहराही समोर येत नाही. कोणीही बहुमत िमळवून सत्तेवर आला तरी त्याला पैशांचाच खेळ करावा लागणार... आिण ही सत्ता िटकवण्यासाठी पैशांचाच आधार घेवून उद्याचा महाराष्ट्र उभा राहणार...
जे गुवाहटीला गेले त्यांचे भले होओ... पण आजच सांगून ठेवतो... यातील ५० टक्के आमदार आपल्यावरील ई.डी.ची बला टळो, या हिशोबाने गेले आहेत. कोणी आमदार जाधव मॅडम आहेत... यांनी तर ते जाहीरच करून टाकले... केंद्रातील भाजपाच्या सरकारचे हेच धोरण आहे... जी राज्ये आपली नाहीत, तिथं सर्व केंद्रीय यंत्रणा वापरून त्या सरकारांची तोडफोड करायची. कर्नाटकात तेच झाले... मध्यप्रदेशमध्ये पुन्हा शिवराजमामा मुख्यमंत्रीपदी त्याच पद्धतीने आले. ितथेही आमदार फोडले. तोच प्रयोग महाराष्ट्रात झाला. नुसात झाला नाही तर या भयानक राजकीय नाट्याची अतिशय पद्धतशीर आखणी करून झाला.
कोण चूक, कोण बरोबर? याची चर्चा होत राहील.... पण खंत एवढीच वाटते की, महाराष्ट्राचे आघाडीचे सरकार एवढे झोपून कसे राहिले... त्यामुळे गाफील रहाणाऱ्या सरकारने बेफीकीरीमध्येच हे सरकार कोसळेपर्यंत वेळ आणली. राज्याचा गृह राज्यमंत्री (शंभुराजे देसाई) सुद्धा सुरतपर्यंत पोहोचतो... त्याचा पत्ता लागत नाही. एखाद्या जादूगाराने २४ तास संपूर्ण विधानभवनातील नेत्यांना गुंगीचे औषध द्यावे, तशी स्थिती आहे. उद्धवसाहेब म्हणाले, ‘माझ्याच लोकांनी मला फसवले....’ अर्थात जे गेले त्यांची हालत खराब होईल, हे तर नक्कीच आहे... एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांिगतले की, ‘आमच्या मागे महाशक्ती आहे...’ ही महाशक्ती म्हणजे दुसरी ितसरी कोणी नाही... अमेरिका, रशिया नाही... तर मोदी, शहा यांचीच ही महाशक्ती आहे. त्यांच्या संमतीनेच हे सगळं घडले... भाजपा आता यांना वापरून घेणार आिण एकनाथ शिंदे सोडले तर बाकीच्यांना वापरले की, चोथा करून फेकून देणार... हे असेच घडणार.... महाराष्ट्रात फडणवीसांनी हा प्रयोग यापूर्वीही केला... त्यावेळच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांनाच त्यांनी पळवले... माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना पळवले.. ितकडे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष मधुकर िपचड यांना पळवले... बबन पाचपुते यांना पळवले... मराठवाड्यात सुर्यकांता पाटील आिण माजी मंत्री भास्करराव खतगावकर यांना पळवले.
आज हे सगळेजण पस्तावलेले आहेत. भास्करराव पाटील तर काँग्रेसमध्ये परत आले. शिंदे यांच्यासोबत जे ३५-४० आमदार असल्याचे सांिगतले जाते, त्यांचीही हालत अशीच होईल. या सगळ्यांना सत्ता द्यायची म्हटली तर जे भाजपासाठी वर्षांनुवर्षे काम करत आहेत त्यांना बाजुला फेकून द्यावे लागेल.... आजही त्यांच्यामधील असंतोष नेत्यांनी समजून घेतला नाही तर उद्या भाजपामध्येही एखादा ‘एकनाथ िशंदे’ िनघेल. आता िशंदेंच्या माणसांना ठाण्यात मंत्री करायचे तर.... संजय केळकर यांना फेकून द्यावे लागेल. िनष्ठावंत माधव भंडारी आयुष्यभर सतरंज्या उचलत आहेत... असे भाजपामध्येही हळूहळू असंतोषाचे स्फोट होवू लागतील. एकनाथ शिंदे यांना अगदी स्पष्टपणे सांगायला हवे की, आज तुम्हाला हे बंड जरी गोड वाटत असले तरी.... जेव्हा सत्तावाटप होईल तेव्हा तुमचेच अर्धे लोक तुमच्या विरोधात उभे राहतील... यापूर्वी असे घडलेले आहे. सर्वांना सत्तेत सामावून घेता येणे शक्य नाही. तुमच्या भोवती जमलेले कोणीही ‘त्यागी’ आिण ‘सेवाभावी’ आहे, असे अजिबात समजू नका... सत्तेसाठीच ते तुमच्या भोवती आहेत. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आिण राष्ट्रवादीने पाठींबा िदला तोही फार मोठ्या तात्विक भूमिकेने िदला, असे अिजबात नाही. त्यात राजकीय तडजोड होतीच.... ‘भाजपा नको’, ही भूमिका होतीच... आिण ती योग्यच होती. पण सत्ता िमळणार याचा लोभ जास्त होता आिण ती िमळाल्यानंतर अडीच वर्षे आघाडीच्या सगळ्याच पक्षांच्या डोक्यात सत्ता गेली. सेनेच्या डोक्यात जास्त गेली. आमदार िशरसाट यांचे पत्र शांतपणे वाचा... असंतोष का निर्माण झाला, याची कारणं त्यात आहेत आिण ती नेमकी आहेत. संजय राऊत यांच्याबद्दल सेनेच्या आमदारांचीच काय भावना होती, हे त्या पत्रात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे.
उद्या उद्वव ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतर शिवसेनेचे लढाऊ सैनिक त्यांच्या सोबत राहतील. आजचा संघर्ष थोडासा अडचणीचा वाटला तरी शिंदे यांच्या सेनेला महाराष्ट्रात पाठींबा िमळणार नाही.... ठाण्यातसुद्धा मामुली पािठंबा मिळेल. आज जो पािठंबा आहे तो तात्पुरता आहे. शिवसेनेचे नेेते म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा रस्त्यावर उतरले तर त्यांच्याच बाजूने शिवसेनेचे कडवे लोक उभे राहतील. पण त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. उद्या फडणवीसांचे सरकार आले तरी न डगमगता, हा संघर्ष दोन वर्षे चालू ठेवावा लागेल. छत्तीसगढ म्ाध्ये भाजपाचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या विरोधात काँग्रेसचा आमचा भूपेश बघेल दोन वर्षे लढत राहिला. लोकांनी त्याला साथ दिली. त्यांनी भाजपाला पराभूत करून, छत्तीसगढमध्ये सरकार आणून दाखवले.
आज तेच मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेने संघर्षांची भूमिका घेतली तर बंड करणारे उघडे पडतील. पण, त्यासाठी उद्धवसाहेबांनाही चिंतन करावे लागेल. शिवसेनेवर ही वेळ ज्यांनी आणली अशा मंडळींना बाजूला करावे लागेल. ज्या तोऱ्यात त्यांच्या भोवतीची मंडळी मिरवत आहेत, तो तोरा आता चालणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. संजय राऊत राज्यसभा िनवडणुकीत विजयी झाले. त्यांच्याच पक्षाचा उमेदवार संजय पवार पराभूत होताे, आिण संजय राऊत यांच्या अिभनंदनाचे फलक लागतात त्या फलकावर संजय राऊत यांचा फोटो, त्याच्यामागे लोकसभेचा फोटो आणि त्यावर ‘सरकार’ अशा शब्दांत अिभनंदन... हे सगळे अतिरेकी प्रकार तुमच्या आमदारांना पसंत पडलेले नाहीत. लोकांना तर अिजबात पडलेले नाहीत. लोकांना न भेटणे, मुलाखतीची वेळ दिल्यानंतरही ती वेळ न पाळली जाणे, लोकांपासून दूर राहणे या चुका घडलेल्या आहेत. लोकांचे िढगभर प्रश्न पडलेले आहेत. आिण सरकार वरळीभोवती फिरत राहिले अाहे. हे ही लोक पाहत आहेत. असंतोष एका िदवसात िनर्माण होत नसतो.
मात्र, आता मागे काही घडले असले तरी महाराष्ट्रात पुन्हा तोडफोड करून सरकार िनर्माण करण्याच्ाा प्रयत्न फडणवीस करतील... ‘मीच पुन्हा.... ’ यासाठी त्यांचा आटापीटा आहे. पण, त्यांचे पुन्हा येणे महाराष्ट्राला १०० वर्षे मागे घेवून जाईल... युती झाली तेव्हाच महाराष्ट्राची माती झाली होती. आता या नवीन युतीने महाराष्ट्र उद्धवस्त होईल. आजच तो झालेला आहे. सामान्य माणसांचे जगण्याचे प्रश्न अतिशय कठीण झालेले असताना महाराष्ट्रातील सरकार मृतप्राय आहे. सरकार जागेवरच नाही. वृत्त वाहिन्यांना तोडफोडीच्या बातम्यांिशवाय दुसऱ्या बातम्या नाहीत. वृत्तपत्रांचीही तीच अवस्था आहे. महाराष्ट्रावर ही अशी वेळ येईल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते.
राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामािजकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या सभ्य आिण सुसंस्कृत महाराष्ट्र आज उद्धवस्त झाल्यासारखा आहे आिण या महाराष्ट्राला पुन्हा कोण सावरील.... तो नेताही आज डोळ्यासमोर नाही... कोणीतरी मुखयमंत्री होईल... कोणालातरी लॉटरी लागेल... कोणाचं तरी मंत्रीमंडळ होईल... पण, त्या सत्ताधीशांचा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाशी कसलाही संबंध राहणार नाही... ‘सत्ता आिण पैसा’ आिण ‘पैशासाठी सत्ता’ या चक्रातच महाराष्ट्र आता गुरफटून गेला आहे. महाराष्ट्राचा गरीब अिभमन्यू या चक्रव्यूहातून बाहेर कसा पडणार हे त्या अिभमन्यूलाही समजेनासे झालेले आहे. महाराष्ट्राला या सगळ्यातून बाहेर काढणारा नेताही आता राहिलेला नाही. सरकारे येतील आिण जातील... पण, एकेकाळचा देशात लौकीक असलेला महाराष्ट्र आज बदनाम होवून गेला. ही बदनामी कशी भरून िनघेल?
- मधुकर भावे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.