Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न

 मिरजेत शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न


अ‍ॅड.  प्रविणा  हेटकाळे यांचा आरोप 

मिरज : मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याला लागून असलेली जागा शासनाच्या मालकीची आहे. मात्र या जागेत मिरजेतील एक कुटुंब एका बिल्डरला हाताशी धरून बांधकाम करत आहे. संबंधित कुटुंबासह त्या बिल्डरचा रस्त्यालगतची शासकीय जागा हडपण्याचा प्ऱयत्न सुरू आहे, असा आरोप अ‍ॅड. प्रविणा हेटकाळे यांनी केला आहे. दरम्यान या जागेत होत असलेल्या बांधकामाची तसेच जागेबाबतची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. मात्र जिल्हाधिकार्‍यांचा हा आदेश बेदखल करण्यात आल्याचेही अ‍ॅड. हेटकाळे यांनी म्हटले आहे.  

अ‍ॅड. हेटकाळे कुटुंबिय मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यालगत कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारी राहणार्‍या कांबळे कुटुंबियांनी त्यांची जागा विकसित करण्यासाठी गिरीष मोहिते या बिल्डरला दिली आहे. कांबळे आणि मोहिते यांनी हेटकाळे कुटुंबाकडे त्यांचीही जागा विकसित करण्यास मागितली होती. मात्र त्यास नकार दिल्याचे अ‍ॅड. हेटकाळे यांनीबोलताना सांगितले.  

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही तक्रारी दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनंतरही ज्या अधिकार्‍यांविरोधात तक्रार आहे त्यांच्याकडेच या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली आहे. याबाबत तक्रारी करू नयेत यासाठी राजकीय, वकील लोकांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोपही अ‍ॅड. हेटकाळे यांनी केला आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी, बिल्डर यांच्या बेकायदेशीर कामांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी अशीही मागणी हेटकाळे यांनी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.