Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकनाथ शिंदे यांच्या गावाबाबतची ती बातमी खोटी...

एकनाथ शिंदे यांच्या गावाबाबतची ती बातमी खोटी...

 

: गावात शाळा, दवाखाना आणि चकाचक रस्ते असल्याचे उघड.


सातारा : सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे एकमेकांवर मोठ्या प्रमाणात राजकीय चिखलफेक सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावाबाबत दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित केले जात आहे. शिंदे यांच्या मूळ गावी (मु.पो.दरे, ता.जावळी, जि. सातारा) येथे शाळा व दवाखाना नाही, अशी तथ्यहीन आणि निराधार बातमी काही माध्यमांनी चालवली आहे. मात्र याबाबत पडताळणी केली असता अखेर सत्य समोर आलं आहे. आमच्या न्यूज पोर्टलने, याची खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी जाऊन, शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता, दरे गावी शाळा, दवाखाना आणि गावातील सर्व रस्ते चकाचक असल्याचे दिसले.



नेमकं काय आहे सत्य?

एकनाथ शिंदेंचं मूळ गाव दरे हे अतिशय दुर्गम भागात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडील भागात वसलेलं आहे. सन १९६२ साली कोयना धरण बांधण्यात आले. त्यावेळी कोयना भागातील सर्व गावाचे पुनर्वसन झाले. त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील शिल्लक असलेल्या जागांवर १० टक्के लोकं पुन्हा गावात वास्तव्यास आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दरे गावची आज रोजी लोकसंख्या १०० ते १२५ इतकी आहे. या गावच्या मूळ लोकसंख्येचा विचार करता, लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे गावात शाळा आहे. तसेच दवाखान्याच्या सोई-सुविधा हाकेच्या अंतरावरील तापोळा, बामनोली या शेजारील गावात आहेत. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळाही शेजारील गावांमध्ये आहे.



एकनाथ शिंदे यांचं मातीशी घट्ट नातं

आपला दांडगा जनसंपर्क आणि लोकसेवेमुळे राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान निर्माण करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची आजही आपल्या गावाशी घट्ट नाळ जुळलेली आहे. मंत्रिपदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदे हे आपले पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत स्वतःच्या शिवारात फेरफटका मारून, शेतीत काम करत असल्याचं याआधी अनेकदा दिसून आलं आहे. तसंच गावी गेल्यानंतर ते गावकऱ्यांची आस्थेवाईपणे चौकशी करून त्यांच्या अडीअडचणी दूर करतात, असे स्थानिक नागरिकांनी आवर्जून सांगितले. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या राजकीय गदारोळात शाळा, वैद्यकीय सुविधा व रस्ते नसल्याची खोटी माहिती प्रसारित करून आमच्या गावाची नाहक बदनामी करू नका, अशी भावना दरे गावातील नागरिक व्यक्त करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.