Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खून प्रकरणी बीडच्या पती-पत्नीला जन्मठेप.

 खून प्रकरणी बीडच्या पती-पत्नीला जन्मठेप.



अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खून केल्याबद्दल संजय उद्धव जाधवर व त्याची पत्नी उमा संजय जाधवर (दोघे रा. काशीदवाडी ता. केज जि. बीड ) यांना जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय श्रीधर राजंदेकर यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये व प्रमुख जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.



याबाबत अधिक माहिती अशी की, संजय व उमा जाधवर तसेच मयत सखाराम कदम हे तिघे जण  जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत. साखर कारखान्याच्या ऊस तोडणी करता मजूर म्हणून ते कोल्हापूर जिल्हयात येथे आले होते. यापैकी सखाराम कदम ्.  हा ट्रॅक्‍टर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. सखरामचे उमा बरोबर  अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय जाधवर यांना होता. दि. ९ मार्च २०१३ रोजी संजय जाधवर यांने रोहित माळी यांच्या मदतीने सखाराम कदमला शरद साखर कारखन्यासमोर बोलावून घेतले. त्यावेळी संजय जाधवर यांनी सखाराम यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला व सकारामचे मुंडके व धड वेगवेगळे करून ते प्रेत नदीपात्रात लपवून ठेवले. 

त्यानंतर सखारामच्या ट्रॅक्टर मालकाने सखाराम हरविला असल्याची तक्रार पोलिसात दिली. काही दिवसांनी ते मुंडके नसलेले अनोळखी प्रेत सांगली जिल्ह्यातील समडोळी नदीपात्रात तरंगत आल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले व त्यानी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यास याबाबत कळविले. त्या प्रेताच्या अंगावर केवळ अंडरवेअर होती. उप निरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल करून तपासाला सुरुवात केली व काही तासात पोलीसांनी आरोपींना अटक केली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस आता खुनाचा गुन्हा नोंद झाला. उपविभागीय अधिकारी बनसोडे यांनी या प्रकरणी तपास करून आरोपपत्र दाखल केले.त्यांना पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी मदत केली. सरकार पक्षातर्फे एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आश्विनी राख डॉक्टर व अन्य साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने खून व गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भादवि कलम ३०२ व २०१ अन्वये दोषी ठरवून संजय जाधवर व उमा जाधवर यांना शिक्षा सुनावली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.