Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पर्यावरण दिनानिमित्त रविवारी रक्तदान शिबिराचे महापालिकेकडून आयोजन

 पर्यावरण दिनानिमित्त रविवारी रक्तदान शिबिराचे महापालिकेकडून आयोजन


सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व श्री वसंत दादा पाटील रक्तकेंद्र व रक्तविकार संशोधन केंद्र मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत ५ जून पर्यावरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 रक्तदान शिबीर हे आमराई सांगली येथे रविवार दि ५ जून २०२२ रोजी  सकाळी ७ पासून सुरू होईल. सदर रक्तदान शिबिर हे रक्ताचा तुटवडा झाल्यामुळे आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घ्यावा. तसेच प्रत्येक रक्तदात्यास रक्तगट कार्ड व प्रमाणपत्र दिले जाईल असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.