Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोहित कंबोज यांचे संजय राऊतांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट

 मोहित कंबोज यांचे संजय राऊतांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट


मुंबई, 27 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत सापडली आहे. शिंदे यांच्या खेळीवरून भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह ट्वीट केले आहे.

या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेवर एकदाही टीकेची संधी न सोडणार मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचा फोटो मार्फ करून त्यांना महिलेच्या वेशात दाखवण्यात आले आहे. पहचान कौन असं मजकूरही या ट्वीटवर मोहित कंबोज यांनी लिहिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून मोहित कंबोज यांनी सेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एवढंच नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे ट्वीटही कंबोज यांनी केली.विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे हे जेव्हा आमदारांना घेऊन सुरतला पोहोचले होते. त्यावेळी मोहित कंबोज, आमदार रवींद्र चव्हाण सोबत असल्याचे सांगितलं जातंय.

त्यानंतर शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते, त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय सुद्धा सोबत होते. रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय हे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गेले होते.गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार यांची जबाबदारी संजय कुटे, मोहित खंबोज, डोंबिवली आमदार चव्हाण यांच्याकडे दिली आहे. या तीन लोकांवर सर्व समन्वय आणि सोबत राहण्याच्या सूचना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीच केली असल्याचे समोर आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.