Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुसेवाला हत्या प्रकरणाला नवे वळण, पुण्यात अटक झालेल्या सौरभ 'महाकाल'बाबत नवी माहिती समोर

 मुसेवाला हत्या प्रकरणाला नवे वळण, पुण्यात अटक झालेल्या सौरभ 'महाकाल'बाबत नवी माहिती समोर


दिल्ली, 08 जून : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले होते. अखेरीस या प्रकरणात सौरभ महाकाळ या पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकारणाला एक नवे वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या पुण्यातील सौरभ महाकालबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे नवीन माहिती - स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक यापूर्वीच अनेक गुंडांचा शोध घेत आहे. तसेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचाही तपास करत आहे. यासाठी आमचे पथक आठ संशयित आरोपींची चौकशी करत आहे. आमच्या पथकाने तपासादरम्यान पाच आरोपींना ओळखले.

यातील एक आरोपी सितेश हिरामण कमळे उर्फ ​​'महाकाल' याला संयुक्त कारवाईत पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तसेच आमची टीम सध्या पुण्यात संयुक्तपणे आरोपींची चौकशी करत आहे. आरोपी महाकाल याचा खुनात सहभाग नव्हता. मात्र, खून करणाऱ्या शूटरशी त्याचे अतिशय जवळचे संबंध होते.

दोघेही अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होते. तसेच त्यांनी एकत्र अनेक खून केले आहेत. स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी पुढे सांगितले की, अभिनेता सलमान खानशी संबंधित धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आम्ही गँगस्टर लॉरेन्स विश्नोईची सतत चौकशी करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं होतं? पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.