Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

म्हैसाळमधील आत्महत्या नव्हे तर हत्याकांड

म्हैसाळमधील आत्महत्या नव्हे तर हत्याकांड




सोलापूरच्या दोघांना अटक, दीक्षित गेडाम यांची माहिती

सांगली :- म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊजणांनी आत्महत्या केल्या नसून विषारी द्रव्य देऊन त्यांच्या हत्या केल्याचे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी सोलापूर येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. तर या कुटुंबाच्या मृत्यूप्रकरणी याआधी खासगी सावकारीबाबत 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 19 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटकेतील दोघे तांत्रिक, मांत्रिक किंवा भोंदू बाबा आहेत का याचा तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. अब्बास महमंदअली बागवान (वय 48, रा. सोलापूर), धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 30, रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही गेडाम यांनी यावेळी सांगितले.



रविवारी दि. 19 रोजी रात्री म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे, पोपट वनमोरे या दोन भावांच्या कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. घटनास्थळावरील पंचनामा आणि या दोघांनीही मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी यावरून पोलिसांनी कर्जबाजारीपणातून दोन्ही कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांना व्याजाने पैसे देणार्‍या 25 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच खासगी सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील 19 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. वनमोरे कुटुंबाचा घातपात केल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर बागवान आणि सुरवशे यांनीच त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अशोक वीरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार, चेतन महाजन, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, विक्रम खोत, सचिन कनप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.