Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत साडेतीन लाखांच्या बनावट नाेटा जप्त, तिघांना अटक

 मिरजेत साडेतीन लाखांच्या बनावट नाेटा जप्त, तिघांना अटक


मिरज : मिरजेत कृष्णा घाट येथे मंगळवारी रात्री वीटभट्टीजवळ रात्रीच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या मोटारीतून रेक्झिन बॅगेतून आणलेल्या ३ लाख ५६ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

'भारतीय बच्चो का बँक' असे छापलेल्या नोटांची ५५ बंडले व त्यावर ५०० रुपयांच्या खऱ्या चलनी नोटा लावून व दोन हजार रुपयांच्या हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या नोटांचे ४५ बंडल ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी उमर खुदबुद्दीन एकसंबेकर (रा. सोमवार पेठ, कागल, जि. कोल्हापूर), नदीम सज्जन नालबंद (रा. नदीवेस नाका, इचलकरंजी) व शब्बीर साहेबहुसेन पीरजादे (रा. गुरुवार पेठ, मिरज) या तिघांना पाेलिसांनी अटक केली आहे.


तिघेजण बनावट नोटा घेऊन मिरजेत येत असल्याची माहिती मिळाल्याने गांधी चौक पोलिसांनी सापळा रचला होता. शास्त्री चाैकात मोटार आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून नोटा हस्तगत केल्या. या बनावट नोटा कोणाची तरी आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने आणल्याच्या संशयाने गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी उमर एकसंबेकर, नदीम नालबंद व शब्बीरसाहेब पीरजादे या तिघांना अटक केली. त्यांच्याकडील बनावट नाेटांसह नंबरप्लेट नसलेली मोटार व चार मोबाइल ताब्यात घेतले. याबाबत तिघांवर आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न व मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.