Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोल्ड व्हॅल्यूअर असो. सोन्याचे मुल्यांकन कार्यशाळा,मार्गदर्शन शिबीर संपन्न.

 गोल्ड व्हॅल्यूअर असो. सोन्याचे मुल्यांकन कार्यशाळा,मार्गदर्शन शिबीर संपन्न.


गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनचे दि. 12 जून रोजी दैवज्ञभवन सांगली येथे शास्त्रोक्त पद्धतीने सोने मुल्यांकन कसे करावे याचे कार्यशाळा,व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. गोल्डव्हँल्युअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष पदी योगेश कुलथे यांची निवड तर उपाध्यक्षपदी सतीश जोग, जिल्हा सचिवपदी केदार भाटकर. तसेच तालुका कार्यकारणी हि जाहीर केली. सांगली तालुका अध्यक्ष - अभिषेक बेलवलकर  उपाध्यक्ष -मिलिंद पेंडुरकर, समन्वयक -अतुल महामुनी, शैलेन्द्र पेडणेकर, मिरज तालुका अध्यक्ष - मनोज रामचंद्र पोतदार, उपाध्यक्ष-विक्रम देसाई, तासगाव तालुका अध्यक्ष-सदानंद घाडगे, कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष-संजय पोतदार, शिराळा तालुका अध्यक्ष - उमेश बाळकृष्ण पोटे, शिराळा तालुका उपाध्यक्ष - सचिन तुलसीदास परदेशी, इसलामपूर तालुका अध्यक्ष -सुनील मळणगावकर, जत तालुका अध्यक्ष-प्रशांत पोतदार आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.   

बँकेमधील सर्वात कमी वेळेत ग्राहकांना कर्ज मिळवून देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे "सोनेतारण कर्ज" आणि या साठी बँकेत सोन्याचे मुल्यांकन करण्यासाठी "गोल्ड व्हॅल्यूअरची" प्यानेल वर नेमणूक केली जाते, अश्या गोल्ड व्हॅल्यूअरना  शास्त्रोक्त पद्धतीने सोने मुल्यांकन कसे करावे व कार्यप्रणाली, व्हॅल्यूएशन मध्ये येणाऱ्या अडचणी, बांधीव दागिने कसे ओळखायचे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, सोने तपासणीच्या विविध पद्धती, फोर्मिंग आणि कमी टंचाचे दागिने कसे ओळखायचे, कसोटीचे प्रकार, त्यांचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन.  अशा अनेक आणि महत्वपुर्ण विषयाचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक रविवार दि. 12 जून रोजी  दैवज्ञभवन सांगली -कोल्हापूर रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आला. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी महारष्ट्र राज्य गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम काळे (मुंबई), उपाध्यक्ष नचिकेत भुर्के (कोल्हापूर), सचिव श्री सतीश पितळे (मुंबई), तसेच तज्ञ मार्गदर्शक भरत ओसवाल (कोल्हापूर), यांच्या मार्गदर्शनाखाली पारपडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अनिल दादा गडकरी (अध्यक्ष दैवज्ञ समाज संस्था, सांगली), श्री जितेंद्र पेंडुरकर (अध्यक्ष सांगली जिल्हा सराफ समिती) यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व गणेशपूजन करून करण्यात आला.

सध्या बँकेचा कर्ज प्रकरणातील सर्वात जास्त असा चालणारा व थाकीत् कर्जाचे प्रमाण एकदम कमी असलेला, तसेच बँकेमधील सर्वात कमी वेळेत ग्राहकांना कर्ज मिळवून देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे "सोनेतारण कर्ज" आणि या साठी बँकेत सोन्याचे मुल्यांकन करण्यासाठी गोल्ड व्हॅल्यूअरची प्यानेल वर नेमणूक केली जाते, असे आम्ही "गोल्ड व्हॅल्यूअर" या आधी कधीही एकत्रित आलो नाहीत, त्यामुळे आम्हाला व्हॅल्यूएशन काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, व्हँल्यूएशन फी  वाढवण्याचा मुद्दा असेल, तसेच अनेक व्हॅल्यूअरना कचाट्यात नाहक अडकविण्यात आले आहे, तरी त्यांच्या पाठीशी एक खंबीर असे संघटन असावे अश्या संकल्पनेतून आम्ही संपूर्ण महारष्ट्रातील गोल्ड व्हॅल्यूअरनी एकत्र येऊन "महारष्ट्र गोल्ड व्हॅल्यूअर असोशिएशन" ची स्थापन केली, आम्ही सांगली जिल्ह्यातील व्हॅल्यूअर एकत्र संघटन आहे सर्वसाधारण १५० व्हॅल्यूअर सभासद आहेत,

आम्हा व्हॅल्यूअरना स्थानिक पातळीवरही काही अडचणींना सामना करावा लागतो आम्ही सर्व सराफ-सोनार बँकेच्या प्यानेलवर गोल्ड व्हँल्युअर म्हणून काम पाहत आहोत तरी साध्य बऱ्याच बँकेनि सराफांच्या  व्हँल्यूएशन फी  वाढवण्याचा ऐवजी कमी करण्यास सुरुवात केली आहे,  गेल्या कित्येक वर्षी पासून आम्ही अहे त्या फी मध्ये काम करीत आहोत, बँकेने व्हँल्यूअर्सच्या दृष्टीने कधी विचार केला नाही, त्यामुळे यावर आता खऱ्या अर्थाने विचार करण्याची वेळ आली आहे, सध्याच्या स्थितील वाढती महागाई, आपल्या  बँक कर्मचाऱ्यांचे पगार कित्येक पटीने वाढले परंतु आमचे व्हँल्यूएशन फी चार्जेस कमी करण्यात आले आहेत, सध्याचे सोन्याचे वाढते दर त्यामुळे आमची जवाबदारी हि त्या प्रमाणात वाढत आहे, पूर्वी बँक कर्मचारी आमच्या दुकानात येऊन सोने तपासून घेऊन जात असत, पण आता आम्हाला बँकेत बोलावले जाते, व्हँल्यूअर्स आपले दुकान गिर्हाईक सोडून बँकेत जातो तेव्हा गिर्हाईक परत गेले त्याचे होणारे  नुकसान, बँकेत येणे-जाणेचा खर्च या व अश्या अनेक बाबींचा विचार करता बँकेकडून मिळणारी फी हि खुपच कमी प्रमणात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन तर्फे बँकेकडे काही मागण्या केलेल्या आहेत.

बँकेत खोटी ज्वेलरी घेऊन आलेला कस्टमर व्हँल्यूअर्सनी ती ज्वेलरी खोटी आहे म्हणून प्रमाणित केल्या वरही बँक कोणत्याही प्रकारची कारवाई कस्टमर वर करत नाही. अशा प्रकारे ते कस्टमरला एक प्रोत्साहनच दिल्यासारखेच आहे. तोच कस्टमर हिच ज्वेलरी दुसऱ्या बँकेत घेऊन जातो, आपल्यावर कोणतीही कारवाई होत नाही हे समजल्यामुळे त्यांचं धाडस वाढत आहे हे काम करणार्‍या बर्‍याच टोळ्या याच मुळे निर्माण झालेल्या आहेत. अशी खोटी ज्वेलरी बँकेत सादर करून बँकेची फसवणूक करण्याचा हेतू असतो. 

बँकांमधील गोल्ड्लोन बाबत वाढती स्पर्धा निर्माण झाली आहे, तसेच बँकेने ग्राहकाना आकर्षित करण्यासाठी गोल्ड व्हँल्यूअर्सचे कमिशन आधी पेक्षा कमी केले आहे, परंतु याचा भुर्दंड व्हँल्यूअर्सनी का सोसावा उलट अर्थी सोन्याचे वाढते बजर भाव लक्ष्यात घेता व्हँल्यूअर्सची जबाबदारी आणखीनच वाढलेली आहे, नजरचुकीने एखादा दागिना फेक आला तर बँक व्हँल्यूअर्स कडून त्याची भरपाई करून घेतली जाते त्यामुळे मिळणारी तुटपुंजी फी आणि त्याचा भुर्दंड लाखो रुपये व्हँल्यूअर्स कसा काय सोसणार या पुढील त्रासाचा आपण विचार केला पाहिजे.  (सांगली जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे)व्हँल्यूअर्स बॅकेत सोने परीक्षकाचे काम अगदी चोखपणे बजावत असतात, त्यामळे व्हँल्यूअर्स पण बँकेचा गोल्ड्लोन बिजनेस कसा वाढेल याचाही विचार करून ग्राहकान माहिती देऊन बँकेकडे घेऊन येत असतात, व्हँल्यूअर्स हा बँक आणि ग्राहक यांच्या मधील दुआ आहे.

यदाकदाचित कोणत्याही व्हँल्यूअर्सनी चुकीच्या पद्धतीने कोणत्या प्रकारची चूक करत असल्याचे  आढळल्यास आमच्या गोल्डव्हँल्युअर असोसिएशनशि  संपर्क साधावा वरील प्रमाणे आपल्या मागण्यां गोल्डव्हँल्युअर असोसिएशन मार्फत बँकाना/संस्थांना यांच्या कडे करीत आहोत. अशी माहिती गोल्डव्हॅल्यूअर असो. अध्यक्ष पुरषोत्तम काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी योगेश कुलथे ,सतीश जोग, केदार भाटकर, अभिषेक बेलवलकर, मिलिंद पेंडुरकर, अतुल महामुनी, शैलेन्द्र पेडणेकर,  विक्रम देसाई, सदानंद घाडगे, संजय पोतदार, उमेश बाळकृष्ण पोटे, सचिन तुलसीदास परदेशी, सुनील मळणगावकर, प्रशांत पोतदार आदि पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.