Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत गायकांनी गाणी गात केला परिचरिकेचा सेवानिवृत्ती सत्कार

सांगलीत गायकांनी गाणी गात केला परिचरिकेचा सेवानिवृत्ती सत्कार


सांगलीत गायकांनी गाणी गात केला परिचरिकेचा सेवानिवृत्ती सत्कार : कलाकारांच्या प्रेमाने भारावून गेल्या परिचारिका जयश्री मद्रासी : सांगलीतील अनोख्या सत्काराने वातावरण गहिवरले


सांगली : एरव्ही सेवानिवृत्ती म्हंटलं की हार तुरे फेटे मानपत्र आणि कौतुकाची उधळण आशा गोष्टी या असतातच मात्र सांगलीत एका वेगळ्या सत्काराची जोरदार चर्चा आहे. निमित्त होतं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका जयश्री मद्रासी यांच्या सेवानिवृत्ती सत्काराचे.. 27 वर्षे आपली परिचारिका सेवा बजावत असलेल्या जयश्री मद्रासी या परिचारिका सेवानिवृत्त झाल्या.

जयश्री मद्रासी या गायकही असल्याने त्यांच्या सेवानिवृत्ती सत्काराचे आयोजन सांगलीतील सर्व गायकांनी मिळून केले होते. विशेष म्हणजे काहींनी हार तुरे बुके देऊन जयश्री मद्रासी यांचा सत्कार केला मात्र आपली शासकीय सेवा बजावून गायन क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या जयश्री मद्रासी यांचा सेवानिवृत्ती सत्कार हा गायकांनी गाणी गात साजरा केला. या अनोख्या आणि वेगळ्या सत्काराने परिचारिका म्हणून निवृत्त झालेल्या जयश्री मद्रासी या चांगल्याच भारावून गेल्या.

विशेष म्हणजे सांगलीतील गायकांनी एकत्र येत गाणी गात आपल्या सहकारीचा अनोख्या आणि वेगळ्या पद्धतीने सत्कार केल्याने या सत्काराची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. जेष्ठ गायक के आजेश यांनी या हृदयस्पर्शी सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये राम नाईक, फहिम खान, दीपक चव्हाण, गिरीश लोहाना, दीपक साळुंखे, दिलावर पेठकर, सोनाली केकडे, अनिस जमादार, सुहास फडतरे यांच्यासह सांगली मिरजेतील गायकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता.

गायन क्षेत्रात अल्पावधीत भरारी मारलेल्या रणरागिणी ग्रुपकडूनही जयश्री मद्रासी यांचा सत्कार करण्यात आला. राजकीय सामाजिक आणि शासकीय सत्कार अनेक पाहिले मात्र हा सत्कार सोहळा काही वेगळाच होता. या सत्कार सोहळ्यात भाषणापेक्षा गाणी जास्त गाणीच होती. यावेळी कभी अलविदा ना केहना या सामूहिक गीताने संपूर्ण हॉल मधील वातावरण गहिवरून गेले होते. या कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील परिचारिका जयश्रीताई सतीश मद्रासी या 27 वर्षानंतर आपल्या सेवेतून निवृत्त झाल्या. या त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त एकलव्य अकॅडमीच्या प्राचार्य डॉ. गीतांजली शिंदे, मालती डेव्हलपर्सचे प्रमुख रमाकांत घोडके आणि हेड स्टाफ नर्स वंदना शहाणे यांच्याहस्ते सत्कार करीत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना जयश्री मद्रासी यांनी आपल्या सेवा काळातील अनेक  उजाळा देत परीचारिकेना सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन सर्वाना केले. कार्यक्रमाचे संयोजन दीपक साळुंखे आणि प्रवीण बनसोडे यांनी तर  सूत्रसंचालन के. आजेस यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.