Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळाची पोलखोल भाग—४

माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळाची पोलखोल भाग—४


त्या निवृत्त अधिकाऱ्याचा मनमानी, हुकूमशाही कारभार 


सांगली : सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा सध्याचा प्रभारी निरीक्षक तीन जिल्ह्याचा पगार घेत आहेच. त्याची नियुक्तीच बेकायदा असल्याचा आरोप मंडळाच्या काही सदस्यांकडून केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्याला विरोध करणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे बोलले जात आहे. त्या प्रभारी निरीक्षकाच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभाराला सदस्य वैतागले आहेत. त्याला तातडीने त्या पदावरून हटवण्याची मागणीही काही सदस्यांनी कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ६ सुरक्षा रक्षक मंडळाचे कार्यालयीन कामकाजा करीता माथाडी मंडळातील कर्मचान्यांना अतिरीक्त कार्यभार देऊन सुरक्षा रक्षक मंडळाचे कामकाज करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र सांगलीत या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. संबंधित अधिकाऱ्याच्या बेकायदा नियुक्तीवरून शासनाची फसवणूकच केल्याचे दिसून येते, असेही निवेदनात म्हटले आहे. सांगली माथाडी मंडळातील इतर कर्मचारी सुरक्षा रक्षक मंडळात निरीक्षक या पदावर काम करण्यास तयार आहेत. परंतु त्या निवृत्त अधिकाऱ्याला पुनर्नियुक्ती (मानधनावर) दिल्याने इतर कोणत्याही कर्मचा-याला पदोन्नती देण्यात आलेल्या नाहीत. तसेच मंडळातील एका कर्मचाऱ्याने निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळावी म्हणून कोर्टात केस घातली होती. परंतु त्या कर्मचा-याला भिती घालून व दबाव आणुन कोर्ट केस माघे घेण्यास भाग पाडले आहे, असेही त्या निवेदनात म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.