एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, स्पेशल टीम पडणार गुवाहाटीबाहेर, पुन्हा गुजरात मुख्य केंद्र
गुवाहाटी 25 जून : सध्या महाराष्ट्रात मोठा सत्ता संघर्ष सुरू आहे. महाविकास आघाडीतील पक्षांकडून आपलं सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट सध्या गुवाहाटीमध्ये असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 पेक्षा अधिक आमदार आहेत. अशात आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे.याकरता बडोदासाठीही शिष्टमंडळ रवाना केलं जाणार आहे. या शिष्टमंडळात शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चु कडू यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्तेपदीदेखील असणार आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३३ आमदार फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गाठले आहे.
मागील पाच दिवसांपासून हे बंडखोरांचे नाट्य सुरू आहे. गुवाहाटीमधील 'रॅडिसन ब्लू' हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सेनेचे आमदार तळ ठोकून आहे. खुद्द आसामधील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे पूर्ण मदत करत असल्याचे समोर आले आहे. एकंदरीतच सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना सध्या वेग आला आहे.
एकनाथ शिंदे हे आधी गुजरातमधील सुरतमध्ये मुक्कामी होते. पण, महाराष्ट्रापासून अंतर जवळ असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते. यावेळी भाजपचे नेते सुद्धा सोबत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या बंडाला रसद आणि सुरक्षा पुरवत असल्याचे समोर आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.