Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

“स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे सर्वार्थाने लोकनेते होते : आमदार सुधीरदादा गाडगीळ

 “स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे सर्वार्थाने लोकनेते होते : आमदार सुधीरदादा गाडगीळ


सांगली शुक्रवार ३ जून  2022 :-
भाजपा नेते, प्रेरणास्थान, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांचा  स्मृतिदिना निमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करण्यात आले.  यावेळी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. “स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे सर्वार्थाने लोकनेते होते. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे कार्यालय सदैव उघडे असे. 

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेऊन संबंधितांना त्यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश ते लगेच देत असत. म्हणून भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय जिव्हाळ्याचे नेते म्हणून ते परिचित होते.” असे उदगार यावेळी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी काढले. यावेळी माजी मंत्री व आमदार सुरेशभाऊ खाडे, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, सरचिटणीस केदार खाडीलकर, मोहन वाटवे, नगरसेवक संजय कुलकर्णी, गजानन मगदूम, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, अल्पसंख्यांक सरचिटणीस गौस पठाण, गणपती साळुंखे, उदय मुळे, रोहित नलवडे, प्रसाद  वळकुंडे, हबीब शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.