सुशिक्षीत बेरोजगारांसाठी जत येथे गुरूवारी मेळावा
सांगली, दि. 27, : जत तालुक्यातील 18 ते 45 वर्षे वयोगटातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना या विषयी मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा राजेरामराव महाविद्यालय जत येथे दि. 30 जून 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.