Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दांपत्याविरोधात आरोपपत्र दाखल

 सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दांपत्याविरोधात आरोपपत्र दाखल


सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दांपत्याविरोधात 85 पानांचे आरोपपत्र आज खार पोलिसांनी बोरिवली न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रात पोलिसांनी 23 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तर येत्या 16 जून रोजी राणा दांपत्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

राणा दांपत्याने 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांनी राणा दांपत्याला प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती. नोटीस दिल्यानंतर राणा दांपत्याने हनुमान चालिसा पठण करणारच असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. पोलीस राणा दांपत्याच्या खार येथील घरी गेले तेव्हा त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला. या गुह्यात खार पोलिसांनी तपास करून आज बोरिवली येथील न्यायालयात 85 पानांचे आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात पोलिसांनी तपास अधिकारी संदीप येडेपाटील यांच्यासह 23 जणांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच राणाने केलेले फेसबुक लाइव्ह आणि प्रसारमाध्यमांनी दाखवलेले व्हिडीओ हे पंचनाम्यामध्ये नमूद केले आहेत. आरोपपत्राची पत्र घेण्यासाठी राणा दांपत्य हे बोरिवली कोर्टात आलेच नाही.

16 जूनला कोर्टात हजेरी

राणाच्या वकिलांना पोलिसांनी आरोपपत्राची प्रत दिली आहे. आरोपपत्र सादर केल्यानंतर येत्या 16 जूनला राणा दांपत्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.