Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड किल्ला

 कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड किल्ला


रायगड, 07 जून : 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव या घोषणांनी किल्ले रायगड दुमदुमला. अशा घोषणा देणाऱ्यांमध्ये एक आवाज होता तो कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीबाईंचा. ज्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी या आजीने रायगड सर केला आहे. या आजीचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे . 

कोल्हापूरच्या दिंडनेर्ली गावातील आऊबाई भाऊ पाटील यांनी रायगडावर नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती लावली. तसं रायगडावर वृद्ध व्यक्ती जात नाहीत असं नाही पण ते शक्यतो रोपवेने जातात.पण या आजींनी मात्र पायीच रायगड सर केला आहे. आऊबाई यांनी पहिल्यांदाच हा किल्ला सर केला नाही. तर त्या दुर्गवेड्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 23 किल्ले तरी सर केले आहेत.

ज्या वयात बरेच लोक तीर्थक्षेत्राला जातात त्या वयात आजी दुर्गभ्रमंती करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची गड ही जिवंत स्मारकं असून त्यांचा इतिहास डोळ्यात साठवायला किल्ल्यावर भेट देत असल्याचं त्या सांगतात.या वयात गड चढणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही. अगदी तरुणांनाही घाम फुटतो.

याबाबत बोलताना आजी म्हणाल्या त्रास कुठला उलट तरुण मुलं माझ्याकडे बघून तोंडात बोटं घालतात. गड चढण्याची ऊर्जा मला शिवरायांच्या घोषणेतून मिळते. हे आश्चर्य! 21 व्या मजल्यावरून कोसळूनही 55 वर्षांची महिला जिवंत; कसा झाला चमत्कार पाहा वयाच्या 80 व्या वर्षीही चिरतरुण असणाऱ्या या आऊबाई म्हणजे शिवबांच्या आऊसाहेब म्हणजे त्यांच्या आई जिजाबाई, जिजांचं दुसरं रूपच म्हणावं लागेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.