Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दहा तासात 50 प्रश्न करणाऱ्या ईडीला राहुल गांधींनी एकाच प्रश्नात केलं गप्प

 दहा तासात 50 प्रश्न करणाऱ्या ईडीला राहुल गांधींनी एकाच प्रश्नात केलं गप्प


नवी दिल्लीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नॅशनल हेरॉल्डशी  संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात  सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. सकाळी 11.10 वाजता ईडीच्या मुख्यालयात पोहोचलेल्या राहुल यांची दोन टप्प्यांत 10 तासांपेक्षा जास्त चौकशी झाली. दोन हजार कोटींच्या कथित 'नॅशनल हेरल्ड' घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही चौकशी केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या परदेशातील संपत्तीबाबत प्रश्न विचारले होते. काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने ईडीने राहुल गांधींना आज मंगळवारी पुन्हा बोलावले आहे. या दरम्यान राहुल गांधींनी ईडीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न केला. प्रश्नांची भडीमार करणारी ईडी एकाच प्रश्नात गप्प झाली.

'ईडी'च्या मुख्यालयात राहुल गांधी यांची 'मनी लाँडरिंग'कायद्याच्या कलम 50 खाली दोन टप्प्यांत तीन अधिकाऱ्यांनी चौकशी केली. 'ईडी'च्या कार्यालयात सकाळी सव्वा अकरा वाजता पोहोचलेल्या राहुल गांधी यांची पहिल्या फेरीत तीन तासांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना एक तासासाठी दुपारच्या भोजनासाठी सोडण्यात आले. राहुल गांधी यांनी गंगाराम इस्पितळात जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यांची साडेपाच तास चौकशी करण्यात आली. 'ईडी'च्या प्रश्नांची लांबलचक यादी होती. राहुल गांधी यांना दस्तावेज दाखविण्यात आले. त्यांना कोलकात्याच्या कंपनीविषयी विचारपूस करण्यात आली. राहुल गांधी यांच्या उत्तरावर ईडीचे अधिकारी समाधानी नसल्याने त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येईल, असे 'ईडी'च्या सूत्रांनी म्हटले.

ईडीने राहुल गांधींना कोणते प्रश्न विचारले?

राहुल गांधी यांना यंग इंडिया कंपनीत तुमची भूमिका काय होती? तुमच्या नावावर त्याचे शेअर्स का? शेअर होल्डर्ससोबत तुम्ही कधी मिटिंग केलीये का? काँग्रेसने यंग इंडियाला कर्ज का दिले होते? काँग्रेसला नॅशनल हेरॉल्ड पुन्हा सुरू का करायचे होते?, असे प्रश्न ईडीने राहुल गांधी यांना विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राहुल गांधींचा ईडी अधिकाऱ्यांना सवाल

राहुल गांधी सोमवारी जेव्हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले तेव्हा त्यांची दिवसभरात दोन टप्प्यांत चौकशी करण्यात आली. यादरम्यान राहुल यांनी तपास अधिकाऱ्यांना त्यांचे नाव आणि हुद्द्याबाबत विचारलं. इतकंच नव्हे तर, राहुल यांनी ईडी कार्यालयात फक्त काँग्रेस नेत्यांचीच चौकशी केली जाते की तुम्ही दुसऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवतात?, असा प्रश्न ईडी अधिकाऱ्यांना केला. राहुल गांधींच्या या प्रश्नावर कोणत्याच अधिकाऱ्याने उत्तर दिलं नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.