Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनेकरीता महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी 5 जुलै पर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनेकरीता  महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी 5 जुलै पर्यंत मुदतवाढ



सांगली, दि. 29,  :  अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी तसेच सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दि. 5 जुलै 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालय/ महाविद्यालयांनी दि. 5 जुलै 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे सर्व योजनांचे अर्ज भरुन घ्यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास विद्यालय/ महाविद्यालयास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.