Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यव्यापी उद्यमिता यात्रे अंतर्गत मोफत प्रशिक्षणासाठी 12 जून पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

राज्यव्यापी उद्यमिता यात्रे अंतर्गत मोफत प्रशिक्षणासाठी 12 जून पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन


सांगली, दि. 7,  : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली आणि युथ एड फाउंडेशन पुणे व ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्यामार्फत संपुर्णत: विना अनुदान तत्वावरील राज्यव्यापी उद्यमिता यात्रे अंतर्गत सांगली जिल्ह्यात 13 ते 15 जून 2022 या कालावधीत तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पंचायत समिती मिरज / कवठेमहांकाळ येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत तीन सत्रामध्ये होणार आहे. राज्यव्यापी उद्यमिता यात्रे अंतर्गत मोफत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रशिक्षण घेण्यासाठी  https://forms.gle/or८bgAHJQZDvF२५V६ या लिंकव्दारे  दि. 12 जून 2022 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील नव उद्योजकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार असून युथ एड फाउंडेशन संस्था पुणे मार्फत जिल्ह्यामधील तळागाळातील उमेदवारांचे समुपदेशन करून स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बीज भांडवल प्रदान करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 13 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, विजयनगर येथे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली या कार्यालयास अथवा 0233-2990383 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.  धनंजय महाजन, महात्मा गांधी नॅशनल फेलो मो. 7666750177, ज्ञानू कांबळै, समन्वयक युथ एड फाउंडेशन संस्था मो. 8806634699.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.