शिवसेनेची 12 मतं फुटली, भाजपला 27 मतं जास्त मिळाली...
मुंबई: भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची तीन तर सहयोगी अपक्षांची एकूण 12 मतं फुटली. काँग्रेसची दोन मतं फुटल्याने त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव झालं. या निवडणुकीमध्ये भाजपला अतिरिक्त 27 मतं मिळाली.
भाजपला चार उमेदवार निवडून येण्याची शाश्वती असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीमुळे पाचही उमेदवार निवडून आले. शिवसेना पक्षाची तीन मतं फुटली, तर सहयोगी पक्षाची एकूण 12 मतं फुटली. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला 123 मतं मिळाली होती, आता या निवडणुकीमध्ये त्यांना 134 मतं मिळाली. त्यामुळे भाजपला अतिरिक्त 27 मतं मिळाली आणि त्यांचा पाचवा उमेदवार निवडून आला.
काँग्रेसची तीन मतं फुटली आणि हंडोरे पराभूत
काँग्रेसची दोन मतं फुटल्याने चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसची पहिल्या पसंतीची मतं हंडोरे यांना द्यायचं ठरलं असतानाही त्यांना पहिल्या फेरीत विजयी होता आलं नाही. पहिल्या फेरीत त्यांना 22 मतं मिळालं. तर भाई जगताप यांना 20 मतं मिळाली.
कुणाची किती मतं फुटली?
एकूण मते - 285
महाविकास आघाडीला मिळाली - 151 (शिवसेना=52, राष्ट्रवादी=57, काँग्रेस=42)
भाजप - 134
एकूण = 285
कुणाची किती मतं फुटली?
शिवसेना संख्याबळ (अपक्ष वगळून) - 55
सचिन अहिर - 26
आमश्या पाडवी - 26
एकूण - 52
म्हणजे शिवसेनेची (पक्षाची) 3 मतं फुटली
काँग्रेस संख्याबळ - 44
भाई जगताप - 20
चंद्रकांत हंडोरे - 22
एकूण - 42
म्हणजे काँग्रेसची 2 मतं फुटली
राष्ट्रवादीला किती ज्यादा मतं मिळाली?
संख्याबळ - 51
एकनाथ खडसे - 29
रामराजे - 28
एकूण - 57
6 मतं ज्यादा मिळाली
भाजप संख्याबळ 106
श्रीकांत भारतीय- 30
राम शिंदे -30
प्रवीण दरेकर -29
उमा खापरे - 27
प्रसाद लाड - 17
एकूण - 133
भाजपला पहिल्या फेरीत 27 मतं जास्त मिळाली
अपक्ष आणि छोट्या पक्षांची 29 मतं होती
शिवसेना - 55+ अपक्ष 6 + प्रहार 2 + गडाख 1 = 64 मतं मिळणं अपेक्षित होतं.
मिळालेली मत - 52
शिवसेना 12 मतं फुटली
कुणाची किती मतं फुटली?
एकूण मते - 285
कुणाची किती मतं फुटली?
म्हणजे शिवसेनेची (पक्षाची) 3 मतं फुटली
काँग्रेस संख्याबळ - 44
म्हणजे काँग्रेसची 2 मतं फुटली
भाजपला पहिल्या फेरीत 27 मतं जास्त मिळाली
अपक्ष आणि छोट्या पक्षांची 29 मतं होती
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.