महापालिकेकडून 1 जुलै ते 5 जुलै अखेर वसंत व्याख्यानमालेचे आयोजन
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वि. स. खांडेकर वाचनालयाच्या सांस्कृतिक - शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत "वसंत व्याख्यानमाला" आयोजित करण्यात आली आले.
या व्याख्यानमालेत माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, रेस टू झिरो, माती वाचवा इत्यादी अभियान आणि मोहिमे अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ७५ वर्षे - प्रा. सुनीलकुमार लवटे, माझी वसुंधरा ५ तत्वे - वैजनाथ महाजन, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री - प्रा. डॉ. नंदा पाटील, यलो सिटी, ग्रीन सिटी - आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, प्लास्टिक मुक्त कचरा - प्रा. संजय ठिगळे हे प्रमुख वक्ते सदर विषयावर व्याख्यान देणार आहेत. हि व्याख्यानमाला स्त्री सखी महिला मंडळ हॉल, हनुमान हॉटेल समोर, विश्रामबाग, सांगली येथे दि. १ जुलै ते ५ जुलै २०२२ अखेर दररोज सायं ६ वाजता असणार आहे.
या व्याख्यानमालेचे उदघाटन महापौर दिग्विजय सुर्यवंशी याच्या हस्ते आणि उपमहापौर उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तसेच आयुक्त नितीन कापडणीस, सभापती निरंजन आवटी, सभागृह नेता विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, गटनेता मैनुद्दीन बागवान, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, सभापती समाज कल्याण समिती सुब्राव मद्रासी यांच्या उपस्थितीत हि व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. याचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.