शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपर क्रमांक 1 व 2 ची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द
सांगली, दि. 27, : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 2 डिसेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 व 2 ची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 8 डिसेंबर 2021 अखेरपर्यंत पाठविण्याबात कळविण्यात आले होते. विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET-2021 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल याची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.